सततच्या पावसामुळे द्राक्ष, डाळिंबबागा संकटात 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 जुलै 2020

रोज पडणारा पाऊस आणि वाढती आर्द्रता, यामुळे डाळिंबबागांवर तेल्या रोग आला. द्राक्षबागांत पाणी साठल्याने मूळकूज सुरू झाली. घडनिर्मितीवर दुष्परिणाम होण्याचा धोका निर्माण झाला. सुमारे दोन हजार एकरांतील डाळिंबबागा आणि पाचशे एकरांतील द्राक्षबागा संकटात सापडल्या आहेत. मोठ्या नुकसानीच्या धास्तीने फळबाग उत्पादक चिंतेत पडले. 

शिर्डी ः रोज पडणारा पाऊस आणि वाढती आर्द्रता, यामुळे डाळिंबबागांवर तेल्या रोग आला. द्राक्षबागांत पाणी साठल्याने मूळकूज सुरू झाली. घडनिर्मितीवर दुष्परिणाम होण्याचा धोका निर्माण झाला. सुमारे दोन हजार एकरांतील डाळिंबबागा आणि पाचशे एकरांतील द्राक्षबागा संकटात सापडल्या आहेत. मोठ्या नुकसानीच्या धास्तीने फळबाग उत्पादक चिंतेत पडले. 

हेही वाचा : नगरमध्ये ईएसआयसीधारकांना 25 रुग्णालयात मिळणार आरोग्य सेवा 

राहाता व परिसरातील चार-पाच गावांत सोमवारी तासाभरात तब्बल 62 मिलिमीटर पाऊस कोसळला. पाऊस रोज हजेरी लावत असल्याने डाळिंबबागांतील फळांवर काळे ठिपके दिसू लागले. आर्द्रता वाढल्याने तेल्या रोग आला. या भागात जमिनीत चुनखडीचे प्रमाण अधिक. सततच्या पावसात या चुनखडीमुळे मूळकूज सुरू झाली. डाळिंब उत्पादकांचा औषधफवारणीचा खर्च वाढला. फळांची प्रतवारी घसरण्याचा व त्यामुळे पुढे भावात मोठा फटका बसण्याचा धोका निर्माण झाला. 

जाणून घ्या : खुश खबर : नगरमध्ये 21 जणांची कोरोनावर मात 

द्राक्षबागांवर डाऊनी 
राहाता व परिसरात सुमारे पाचशे एकर क्षेत्रावर द्राक्षबागा आहेत. दमट व ओलसरपणामुळे द्राक्षबागांवर डाऊनी रोग दिसू लागला. बागेत पाणी साठल्याने द्राक्षवेलींची अन्नप्रक्रिया मंदावली. मूळकूज सुरू झाली. सकाळी औषधफवारणी केली, की दुपारी पाऊस येतो. खर्च पाण्यात जातो. शेतकरी हैराण झाले आहेत. 

पावसाचे विषम प्रमाण 
राहाता परिसरात शेतीचे मोठे नुकसान करीत असलेला हा पाऊस सर्वत्र सारखा नाही. 110 किलोमीटर लांबीच्या गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्राचा विचार केला, तर पावसाचे विषम प्रमाण लक्षात येते. सोमवारी झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) आहे. कंसातील आकडे यंदाच्या एकूण पावसाचे आहेत. 
सोमठाणे 22 (177), कोळगाव 8 ( 175), सोनेवाडी 26 (160), शिर्डी 7 (232), राहाता 62 (360), रांजणगाव 8 (276), चितळी 0 (250). अहमदनगर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Grape and pomegranate orchards in crisis due to rains