केंद्र शासनाच्या अमृत योजनेंतर्गत सीना नदी काठावर हरितपट्टा

अमित आवारी
Sunday, 6 December 2020

केंद्र शासनाच्या अमृत योजनेंतर्गत शहरात सीना नदी काठावर हरितपट्टा प्रकल्पांतर्गत वृक्षरोपणाचे काम सुरू आहे.

अहमदनगर : केंद्र शासनाच्या अमृत योजनेंतर्गत शहरात सीना नदी काठावर हरितपट्टा प्रकल्पांतर्गत वृक्षरोपणाचे काम सुरू आहे. त्यामुळे सीना नदी काठ परिसराला सौंदर्य प्राप्त होणार असल्याचे महापालिकेतील स्थायी समिती सभापती मनोज कोतकर यांनी सांगितले. 

सीना नदीवरील लोखंडी पुलाजवळ या वृक्षारोपण प्रकल्पाची पाहणी मनोज कोतकर, नगरसेवक गणेश भोसले यांनी आज केली. तसेच प्रकल्पाविषयी माहिती जाणून घेतली. शहर अभियंता सुरेश इथापे, ठेकेदार संजय दळे आदी उपस्थित होते. 

गणेश भोसले म्हणाले की, या हरितपट्टा योजना वृक्षारोपणामुळे शहराच्या हरित सौंदर्यात भर तर पडेलच शिवाय पर्यावरण संवर्धनास हातभारही लागेल. कोरोना महामारीच्या काळात ऑक्‍सिजनचे महत्व सर्वांना समजले. वृक्षांमुळे आपल्याला मोफत प्राणवायू मिळतो. वृक्षारोपणानंतर त्यांचे योग्य संवर्धन करावे अशा सूचना भोसले यांनी ठेकेदाराला दिल्या. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Green belt on the banks of river Sina in the city under the central government nectar scheme