esakal | मंत्री गडाखांच्या संपर्क कार्यालयात शिवसेनाप्रमुखांना अभिवादन
sakal

बोलून बातमी शोधा

Greetings to Balasaheb Thackeray at the office of Minister Shankarrao Gadakh in Nevasa

शिवसेनाप्रमुख हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना आठव्या स्मृती दिनाच्या निमित्ताने राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेवासे शहरातील संपर्क कार्यालयात अभिवादन करण्यात आले.

मंत्री गडाखांच्या संपर्क कार्यालयात शिवसेनाप्रमुखांना अभिवादन

sakal_logo
By
सुनील गर्जे

नेवासे (अहमदनगर) : शिवसेनाप्रमुख हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना आठव्या स्मृती दिनाच्या निमित्ताने राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेवासे शहरातील संपर्क कार्यालयात अभिवादन करण्यात आले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील युवा  नेते अनिल ताके यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. पाटील म्हणाले, ‘स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत विचार देशातील प्रत्येकाला स्फूर्ती व प्रेरणा देणारे आहे.  त्यांचाच विचाराची आज देशाला गरज आहे.  वीस टक्के राजकारण व ऐंशी टक्के समाजकारण हा पायंडा त्यांनी पाडला. त्यामुळे उपेक्षित घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न होत असून त्यांच्या स्वप्नांची पूर्ती होण्यासाठी राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख हे काम करत आहेत.

तरुणांनी ठाकरे यांच्या विचारातून स्फूर्ती घ्यावी.  यावेळी अनिल ताके, गोरख घुले यांचीही श्रद्धांजलीपार आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी पोपट जिरे, भाऊसाहेब वाघ, अभिजित मापारी,  सुधीर चव्हाण, नगरसेवक सचिन वडागळे, किशोर तट्टू, बालू जिरे,  सुनील जाधव, अन्सार शेख उपस्थित होते.

संपादन : अशोक मुरुमकर