लोकनेते मारुतराव घुले पाटील यांना 'ज्ञानेश्वर'तर्फे अभिवादन

सुनील गर्जे
Wednesday, 16 September 2020

भेंडे (ता. नेवासे) येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाचे संस्थापक लोकनेते मारुतराव घुले पाटील यांना ९० व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

नेवासे (अहमदनगर) : भेंडे (ता. नेवासे) येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाचे संस्थापक लोकनेते मारुतराव घुले पाटील यांना ९० व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

लोकनेते मारुतराव घुले पाटील यांची जयंती दरवर्षी १५ सप्टेंबरला मोठ्या कार्येक्रमाने साजरी केली जाते. मात्र यावर्षी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. दरम्यान सरकारच्या नियमांचे पालन करत लोकनेते घुले पाटील यांच्या स्मृती स्थळावर अभिवादन व प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम झाला.

लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाचे प्रमुख मार्गदर्शक माजी आमदार डॉ. नरेंद्र घुले, अध्यक्ष चंद्रशेखर घुले, उपाध्यक्ष पांडुरंग अभंग, जेष्ठ संचालक ॲड. देसाई देशमुख, काकासाहेब नरवडे, काशिनाथ नवले, 'मुळा'चे उपाध्यक्ष भाऊसाहेब मोटे, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव गणेश गव्हाणेयांनी घुले पाटील यांच्या स्मृतिस्थळावर पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

जेष्ठ नेते भाऊसाहेब पटारे, संचालक रावसाहेब निकम, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, काकासाहेब शिंदे, सुखदेव फुलारी, दत्तात्रय काळे, डॉ. शिवाजी शिंदे, बबन धस, कल्याण म्हस्के, बाळासाहेब आरगडे उपस्थित होते. दरम्यान स्मृतिस्थळावर अभिवादन करण्यासाठी आलेल्यांचे थर्मल स्कॅनिंग करून सॅनिटायझर व मास्क देण्यात आले होते.

लोकनेते घुले पाटलांचे जीवन स्फुर्ती देणारे : उदयन गडाख
लोकनेते मारुतराव घुले पाटील यांचे संपूर्ण कार्य आणि जीवन स्फुर्ती देणारे असल्याचे प्रतिपादन युवा नेते उदयन गडाख यांनी केले. राज्याचे मृद व जलसंपदा मंत्री शंकरराव गडाख पाटील व माजी सभापती सुनीता गडाख यांचे चिरंजीव युवा नेते उदयन यांनी आज लोकनेते घुले पाटील यांचे स्मृतिस्थळावर पुष्प अर्पण करून अभिवादन केले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Greetings to Loknete Marutrao Ghule Patil on behalf of Dnyaneshwar Factory