esakal | अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या वतीने दिवंगत वसंतदादा पाटील यांना अभिवादन
sakal

बोलून बातमी शोधा

Greetings to Vasantdada Patil at Amrutvahini Education Institute Sangamner

स्वातंत्र चळवळीतील नेते दिवंगत वसंतदादा पाटील यांनी ग्रामीण महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री पदाच्या काळात विना अनुदान तत्वावर राज्यात अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्रनिकेतन, मेडीकल कॉलेज, आय.टी.आय यांना मान्यता देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.

अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या वतीने दिवंगत वसंतदादा पाटील यांना अभिवादन

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर (अहमदनगर) : स्वातंत्र चळवळीतील नेते दिवंगत वसंतदादा पाटील यांनी ग्रामीण महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री पदाच्या काळात विना अनुदान तत्वावर राज्यात अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्रनिकेतन, मेडीकल कॉलेज, आय.टी.आय यांना मान्यता देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.

त्यामुळे राज्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उच्च व तंत्रशिक्षणाची सुविधा निर्माण झाली. यातून निर्माण झालेल्या हजारो अभियंते व डॉक्टरांमुळे उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात राज्याचा दबदबा निर्माण होवून अनेक कुटूंबात आर्थिक परिवर्तन झाल्याचे प्रतिपादन अमृतवाहिनी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे यांनी केले. दिवंगत नेते वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त अमृतवाहिनी संस्थेत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी व्यवस्थापक प्रा. व्ही. बी. धुमाळ, प्रा. डॉ. एम. ए. व्यंकटेश, प्रा. गोरक्षनाथ काळे, प्रा. अशोक मिश्रा, प्रा. एस. टी. देशमुख, डॉ. मधुकरराव वाकचौरे, डॉ. विष्णू वाकचौरे, प्रा. मिलींद इंगोले, नामदेव गायकवाड, सिताराम वर्पे, भास्कर बोरकर, सुनिल कडलग, प्रा.बी. डी. पाटील, नरेंद्र मोरे आदि उपस्थित होते. सुत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले.याप्रसंगी संस्थेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

संपादन : अशोक मुरुमकर

loading image