esakal | भुईमुगाचे उत्पादन घटण्याची शक्‍यता
sakal

बोलून बातमी शोधा

Groundnut production is likely to decline

पावसाने थैमान घातल्यामुळे खरिपाचे मोठे नुकसान झाले. सोयाबीन, कापूस, कांदारोपे, मका, बाजरी संकटात आहे. 

भुईमुगाचे उत्पादन घटण्याची शक्‍यता

sakal_logo
By
गौरव साळुंके

श्रीरामपूर (अहमदनगर) : पावसाने थैमान घातल्यामुळे खरिपाचे मोठे नुकसान झाले. सोयाबीन, कापूस, कांदारोपे, मका, बाजरी संकटात आहे. अतिपावसाचा मोठा फटका बसल्याने भुईमुगाचे उत्पादन घटण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. भुईमुगाची अवाजवी वाढ झाल्याने अनेक ठिकाणी शेंगा खूप कमी प्रमाणात लागल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

 
भुईमुगासाठी पाण्याचा निचरा होणारी जमीन पोषक ठरते. अतिपावसामुळे या वर्षी अनेकांचे खरीप पाण्याखाली गेले. नदीपट्ट्यासह पाणथळ जमिनीत सध्या प्रचंड पाणी आहे. सुरवातीपासूनच पावसाने सलग हजेरी लावली. रोज नियमित जोरदार पाऊस पडतो.

अतिपाण्यामुळे शेकडो एकरांवरील खरिपाचे नुकसान झाले. भुईमुगाला यंदा शेंगा कमी लागल्या आहेत. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होणार असल्याचे शेतकरी सांगतात. 
आतापर्यंत तालुक्‍यात 690 मिलिमीटर पाऊस झाला असून, श्रीरामपूर मंडलात 743, बेलापूर मंडलात 588, उंदीरगाव मंडलात 668 आणि टाकळीभान मंडलात 734 मिलिमीटर पाऊस झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली. शेतांमध्ये पाणी साचल्याने पाण्यातच भुईमूग काढण्याची वेळ आली आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर

loading image