
अहिल्यानगर : शहरासह जिल्ह्यातील जामखेड येथे पिस्तुलातून गोळीबार केल्याच्या लागोपाठ दोन घटना घडल्या आहेत. त्यात एकजण गंभीर जखमी झाला आहे. या गोळीबाराने जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे. यापूर्वी देखील गोळीबाराचे अनेक प्रकार घडले आहेत. असे असताना पोलिस प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. वारंवार घडणाऱ्या या गोळीबारामुळे जिल्ह्याची वाटचाल ‘गँगवार’च्या दिशेने सुरू असल्याचे सध्याचे चित्र आहे. त्यामुळे बघ्याची भूमिका सोडून पोलिसांना ठोस कारवाई करावी लागणार आहे; अन्यथा गोळीबारासह खुनाचे सत्र सुरू होण्यासही वेळ लागणार नाही.