
भंडारदरा येथे सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हजारो पर्यटक भंडारदरा येथे आले होते.
अकोले : अकोले तालुक्यातील भंडारदरा येथील थर्टी फस्टला यावर्षी गालबोट लागले आहे. राजूर पोलिसांनी भंडारदरा जवळील मुरशेत येथील एका टेंट हाऊसवर धाड टाकत दारुसह एक चारचाकी वाहन ताब्यात घेतले. संबंधित टेंट हाऊस हे इगतपुरी तालुक्यातील एका शिक्षकाचे आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भंडारदरा येथे सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हजारो पर्यटक भंडारदरा येथे आले होते. या पर्यटकांवर नजर ठेवण्यासाठी राजूर पोलिस 31 डिसेंबरच्या मध्यरात्री पेट्रोलिंग करीत असताना भंडारदरापासून जवळच मुरशेत येथील एका टेंट हाऊस पासून जात असताना त्यावेळेस या ठिकाणी दारुची विक्री पर्यटकांना जादा भावात विकली जात असल्याचे राजूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितिन पाटील यांच्या लक्षात आले.
हेही वाचा - डॉ. सुजय विखे पाटलांनी दिली ७२ घंट्याची मुदत
राजूर पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत चार लाख दहा हजार रुपयांचा किंमती दारुचे दोन बॉक्स व तसेच चारचाकी ताब्यात घेतली. या वेळी या टेंटच्या मालकाने राजूर पोलिसांना "तुम्ही जर माझ्यावर कारवाई केली, तर मी आत्महत्या करेल', अशी धमकी दिली. विशेष म्हणजे हा टेंटचालक एका शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत आहे. राजूर पोलिसांनी दोन व्यक्तींना या संदर्भात ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या धाडसत्रामध्ये राजूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नितिन पाटील यांच्यासह पथकाने कारवाई केली. अहमदनगर