हाथी चलता हैं... कुत्ते भुकते हैं!

अनिल चौधरी
Sunday, 26 July 2020

पारनेर तालुक्‍याचा विकास 15 वर्षांत जाणीवपूर्वक रोखला गेला होता. मात्र, आता तालुक्‍याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे.

निघोज (अहमदनगर) : पारनेर तालुक्‍याचा विकास 15 वर्षांत जाणीवपूर्वक रोखला गेला होता. मात्र, आता तालुक्‍याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. "हाथी चलता हैं.. कुत्ते भुकते हैं..' अशी टीका आमदार नीलेश लंके यांनी विरोधकांवर केली. 

पिंप्री जलसेन येथे गुलाबराव शेळके यांच्या चौथ्या पुण्यतिथीनिमित्त श्री दत्तकृपा पतसंस्थेच्या सभागृहाचे "(स्व.) गुलाबराव शेळके सभागृह' नामकरण, तसेच लंके यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. मळगंगा पतसंस्थेचे अध्यक्ष प्रभाकर कवाद अध्यक्षस्थानी होते. सभापती प्रशांत गायकवाड, दत्तकृपा पतसंस्थेचे अध्यक्ष लहू थोरात, महानगर बॅंकेचे उपाध्यक्ष भास्कर कवाद, सरपंच ठकाराम लंके, मळगंगा ट्रस्टचे सदस्य ज्ञानदेव लंके, बाळासाहेब दिघे, नाना पाटील लंके, शिवाजी औटी, पोपट शेटे आदी उपस्थित होते. 

लंके म्हणाले, ""ग्रामीण भागातील मुलांना स्व-कर्तृत्वावर उभे करण्यात (स्व.) शेळके यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांचे कार्य प्रेरणादायी होते. त्यांचा सहवास जास्त काळ मिळाला नसला, तरी आजही आम्ही त्यांचे विचार डोळ्यांसमोर ठेवून कार्य करीत आहोत.'' 

(स्व.) शेळके यांच्या जाण्याने महानगर बॅंक कशी चालणार, अशी चर्चा असताना, त्यांचे पुत्र ऍड. उदय शेळके हे तितक्‍याच प्रभावीपणे ही बॅंक चालवीत आहेत. राज्याला दिशादर्शक काम त्यांनी केले आहे. पिंप्री जलसेन गावात पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून गीतांजली शेळके यांनी केलेले काम राज्यात आदर्श ठरले, असे लंके म्हणाले. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The hall of Shri Datta Krupa Patsanstha is now called Gulabrao Shelke Hall