Shani Shingnapur Traffic: शनिशिंगणापुरात अडीच लाख भाविक; परिसरातील गावांत वाहतूक कोंडी

2.5 Lakh Devotees Visit Amid Traffic Chaos : दिवाळी सुट्यांमुळे शनिशिंगणापूर येथे भाविकांची गर्दी वाढली. शनिवारी सायंकाळपर्यंत अडीच लाख भाविकांनी दर्शन घेतले. वाहनतळ भरल्याने परिसरातील अनेक गावांमध्ये वाहतूक कोंडी झाली.
Around 2.5 lakh devotees visited Shani Shingnapur on Saturday, causing heavy traffic congestion in nearby villages.

Around 2.5 lakh devotees visited Shani Shingnapur on Saturday, causing heavy traffic congestion in nearby villages.

esakal

Updated on: 

सोनई,: दिवाळी सुट्यानिमित्त पाच दिवसांपासून शनिशिंगणापूरला गर्दीचा ओघ वाढलेला आहे. आज शनिवार असल्याने भाविकांच्या प्रचंड गर्दीने सोनई, घोडेगाव, ब्राह्मणी, उंबरे, तसेच मुळा गट व शनिशिंगणापूर गावात वाहतूक कोंडीचा त्रास झाल्याने भाविक व पंचक्रोशीतील ग्रामस्थ व इतर गावातील व्यावसायिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. सायंकाळच्या सात वाजेपर्यंत अडीच लाख भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला असून, रात्री उशिरापर्यंत गर्दीचा ओघ सुरू होता.

Loading content, please wait...