बघा हा डॉक्टर पेशंट मुलीला म्हणतो, तुला बॉयफ्रेंड औषधाची गरजय

Harassment of a minor girl by a doctor in Shirdi
Harassment of a minor girl by a doctor in Shirdi

शिर्डी ः "श्वास घेण्यास त्रास होतोय? मग "बॉय फ्रेंड' हे त्यावरचे औषध आहे. तुझे हृदय तशी मागणी करीत आहे..' असा अनाकलनीय सल्ला अल्पवयीन मुलीला देणाऱ्या डॉक्‍टरचे संभाषण मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाले. पोलिसांनी लगेच त्यास तुरुंगाची वाट दाखविली.

वडिलांसमवेत आलेल्या रुग्ण अल्पवयीन मुलीबरोबर संबंधित डॉक्‍टरने दोन वेळा आक्षेपार्ह वर्तन केले. दुसऱ्यांदा त्याचे आक्षेपार्ह संभाषण मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाले. त्याआधारे पोलिसांनी त्यास अटक केली. डॉ. वैभव तांबे, असे त्याचे नाव आहे.

या बाबत पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे म्हणाले, की साईसंस्थानच्या रुग्णालयात शनिवारी (ता. 19) पहाटे साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. अल्पवयीन मुलगी वडिलांसमवेत रुग्णालयात आली. तिला श्वास घ्यायला त्रास होत होता. तिच्यासोबत डॉक्‍टरांनी आक्षेपार्ह वर्तन केल्याने ती रडत बाहेर आली.

वडिलांनी तिला, "तुझा गैरसमज झाला असेल,' असे सांगत तिची समजूत काढली. त्यानंतर सकाळी साडेआठच्या सुमारास आई-वडिलांसमवेत ती पुन्हा रुग्णालयात आली.

या वेळी रेकॉर्ड करण्यासाठी तिच्यासोबत वडिलांनी मोबाईल दिला. त्यात डॉक्‍टरने दिलेला हा आक्षेपार्ह सल्ला रेकॉर्ड झाला. त्यानंतर संतापलेल्या आई-वडिलांनी पोलिस ठाणे गाठले.

अपर पोलिस अधीक्षक दीपाली काळे यांनी येथे येऊन मुलीची विचारपूस केली. डॉ. तांबे याच्याविरोधात विनयभंग व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करीत त्यास अटक करण्यात आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com