भाजपकडून सत्तेसाठी इडी-सीबीआयचा वापर : मुश्रीफ

hasan mushrif
hasan mushrif google

नगर : ‘‘भाजपला सत्तेवर येण्याची घाई झाली आहे. सत्ता मिळविण्यासाठी इडी आणि सीबीआयचा वापर केला जात आहे. भाजपने काहीही केले, तरी राज्यात महाआघाडीचे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करील,’’ असा विश्‍वास ग्रामविकास व कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्‍त केला. Hasan Mushrif said the BJP was using the ED-CBI for political power


जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुश्रीफ बोलत होते. ते म्हणाले, ‘‘भाजपला सत्तेची घाई झाली आहे. त्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ लागले आहेत. इडी आणि सीबीआयचा वापर त्यासाठी केला जात आहे. देशातील इतर राज्यांचे राज्यपाल बदलले; परंतु महाराष्ट्राचे राज्यपाल बदलले नाहीत. भाजपला अनुकूल भूमिका ते घेत आहेत. ज्येष्ठ नेते विनय कोरे यांच्या मातोश्रींच्या निधनानंतर सांत्वन करण्यासाठी गेलो. त्या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट झाली होती. त्या वेळी त्यांनी, भाजपचे सरकार आल्याशिवाय राज्यपाल आमदारांची नियुक्‍ती करणार नाहीत, असा गौप्यस्फोट केला होता.’’
ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण भाजपमुळेच गेले असल्याचा आरोप त्यांनी केला. त्याची सविस्तर माहिती दिली. ‘‘विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा अधिवेशनात उपस्थित केला. त्यावर मंत्री भुजबळ यांनी सविस्तर माहिती सभागृहाला दिली. फडणवीस मुख्यमंत्री असतानाच आरक्षणासाठी केंद्राचा सामाजिक न्याय विभाग आणि जनगणना विभागाकडे पत्रव्यवहार केला. दोन्ही विभागांकडून टोलवाटोलवी झाली. त्यामुळे आरक्षण रद्द झाले. केंद्राने वेळेवर माहिती दिली असती, तर आरक्षण मिळाले असते. ओबीसींची जनगणना आता स्वतंत्रपणे कोरोना परिस्थितीत करता येणार नाही. जनगणनेनंतरच आरक्षण देता येईल,’’ असे त्यांनी स्पष्ट केले.


राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, कॉँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मनात आहे तोपर्यंत आघाडी सरकार टिकणार आहे. पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला.

hasan mushrif
जिल्हा परिषद सदस्या ते केंद्रीय मंत्री; भारती पवार यांचा प्रवास

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com