पहाटे गाड झोपेत असलेल्या महिलेचे कान तोडुन दागिने पळविले

संजय आ. काटे
Monday, 21 December 2020

चिंभळे शिवारात पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी महादेव जाधव यांच्या घरात जबरी चोरी करीत महिलेला जखमी केले.

श्रीगोंदे (अहमदनगर) : तालुक्‍यातील चिंभळे शिवारात रविवारी (ता. 20) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी महादेव जाधव यांच्या घरात जबरी चोरी करीत महिलेला जखमी केले. सोन्याचे दागिने देण्यास विरोध करणाऱ्या विमल महादेव जाधव यांचे दोन्ही कान तोडून कानातील दागिने ओरबाडून नेले. 

दरोडेखोरांनी या लुटीत 50 हजारांचा मुद्देमाल लुटला. चिंभळे पासून काही अंतरावर महादेव जाधव व विमल जाधव दोघे वयोवृद्ध राहतात. हे दोघेही घरात झोपले असताना पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास दरोडेखोरांनी घराची कडी वाजवत दरवाजा उघडण्यासाठी धमकावले. दरवाजा उघडताच विमल यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

दागिने काढून देण्यास विरोध करताच चोरट्यांनी कानातील दागिने जोरात हिसकवले. त्यात विमल जाधव यांच्या कानाच्या दोन्ही पळ्या तुटल्या. दोन्ही कान तुटल्याने त्या जखमी झाल्या. गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने व इतर ऐवज असा पन्नास हजारांचा मुद्देमाल लुटुन नेला. दरम्यान, घटनास्थळी श्वान पथकास पाचारण करण्यात आले. त्यातून तपासाला विशेष दिशा मिळू शकली नाही.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The he broke the ear of a sleeping woman and snatched the jewelery

Tags
टॉपिकस