माशाचं कालवण न केल्याने बायकोला जीवेच मारलं, तिचं वेगळंच म्हणणं होतं

He killed his wife for not allowing her to grow vegetables as she wishedHe killed his wife for not allowing her to grow vegetables as she wished
He killed his wife for not allowing her to grow vegetables as she wishedHe killed his wife for not allowing her to grow vegetables as she wished

राहुरी : पती-पत्नीमध्ये नेहमीच कुरबुरी होत असतात. ही भांडणं काहींची लगेच मिळतात. त्या वरून कोणी रागाच्या भरात बरेवाईटही करतं. राहुरीतही असाच काही प्रकार घडला.

माशाची भाजी न केल्याने डोक्‍यात दगड घालून ऊसतोड मजुराने पत्नीचा खून केला. तालुक्‍यातील कुक्कडवेढे येथे सोमवारी रात्री हा प्रकार झाला. गंगाबाई बद्री चव्हाण (वय 41) असे मृताचे नाव आहे. 

राहुरी पोलिसांनी तिचा आरोपी पती बद्री फुला चव्हाण (वय 46, रा. कळनकी, ता. कन्नड, जि औरंगाबाद) यास अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. याबाबत राहुरी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविला आहे. 

आरोपी बद्री याने सोमवारी रात्री मासे आणून पत्नीला त्याची भाजी करायला सांगितले. मात्र, सोमवार असल्याने पत्नीने माश्‍यांची भाजी करण्यास नकार दिला. त्यावरून दोघांत कडाक्‍याचे भांडण झाले.

रागाच्या भरात आरोपी बद्रीने पत्नी गंगाबाईला कोपीतून ओढत बाहेर नेले. लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण करीत डोक्‍यात दगड घालून खून केला. 

कुक्कढवेढे येथे त्यांच्या कोपीजवळ मुळा धरणाच्या उजव्या कालव्याच्या बाजूला पाण्याच्या डबक्‍याजवळ अर्धनग्न अवस्थेत आज सकाळी गंगाबाईचा मृतदेह आढळला. अपर पोलिस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, परिविक्षाधीन सहायक पोलिस अधीक्षक आयुष नोपानी, राहुरी पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक सचिन बागुल यांनी पथकासह घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला.

या बाबत त्यांचा मुलगा पृथ्वीराज बद्री चव्हाण (वय 18) याच्या फिर्यादीवरून, आईचा खून केल्याप्रकरणी आरोपी वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com