पुन्हा "काम बंद'चा इशारा देताच कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी 

amc nagar
amc nagar
Updated on

नगर : महापालिका कर्मचाऱ्यांची आज दुपारपर्यंत आरोग्य तपासणी न केल्यामुळे, कर्मचाऱ्यांनी पुन्हा "काम बंद'चा इशारा दिला. त्यानंतर महापालिका अधिकाऱ्यांना खडबडून जाग आली. यंत्रणा हलवीत तातडीने कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केली. 

महापालिकेत कोरोनाचा शिरकाव झाल्याने आरोग्य तपासणी करण्यासाठी तीन दिवस कर्मचाऱ्यांनी "काम बंद' आंदोलन केले. महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या मध्यस्थीने महापालिका कामगार संघटनेने आंदोलन मागे घेतले. त्या वेळी महापालिका आयुक्तांनी, आज सकाळपासून नवीन प्रशासकीय इमारतीतील कर्मचाऱ्यांसह सर्व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, दुपारी साडेबारा वाजेपर्यंत कोणीच आले नाही. त्यानंतर एक आरोग्य पथक आले, तर त्यांना कोरोनाविषयक चाचणीचे प्रशिक्षण दिलेले नव्हते. ही बाब कामगार संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांना समजताच, त्यांनी आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तसेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांना माहिती दिली. मात्र, त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने लोखंडे यांनी "काम बंद' आंदोलनाची हाक दिली. 

महापालिका अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत कर्मचाऱ्यांनी "काम बंद' आंदोलन सुरू केले. महापौर वाकळे आंदोलनस्थळी आले. त्यांनी आयुक्त व वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना बोलाविले. कर्मचाऱ्यांची तातडीने आरोग्य तपासणी करा, अशी सूचना केली. आयुक्तांनी तातडीने चार पथके बोलावून कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी सुरू केली व "काम बंद' आंदोलनाच्या नाट्यावर पडदा पडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Karjat Sets an Example of Humanity as Volunteers Stand by Their Sick Companion
Parents Trust the School, Infrastructure Fails the Students in Akole
Compassion in Action: Hingani Dumala Villagers Support Family After Tragic Loss
Anna Hazare’s Protest Averted as Maharashtra Govt Stays New RTI Rules
Marathi News Esakal
www.esakal.com