
अहिल्यानगर : जिल्ह्यातील ५० टक्के आरोग्यसेवक भरती प्रक्रिया लांबणीवर पडल्याने उमेदवारांमध्ये निर्माण झालेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर खासदार नीलेश लंके यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांची भेट घेतली. आरोग्य सेवकांच्या नियुक्त्यांबाबत तत्काळ निर्णय घेण्याची मागणी केली. त्यावर भंडारी यांनी उमेदवारांचे समुपदेशन करत उमेदवारांना तात्पुरत्या नियुक्त्यांचे आदेश दिल्याचे समजते.