esakal | नगरमध्ये घडलं हीट अँड रन, पथारीवाल्यांच्या अंगावर फिरवला टेम्पो
sakal

बोलून बातमी शोधा

Heat and run took place in Ahmednagar

सालाबाद प्रमाणे यंदाही बुट विक्रेत्यांनी आपली दुकाने फुटपाथवर थाटली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही बुटाची विक्री यंदाही चांगली झाली.

नगरमध्ये घडलं हीट अँड रन, पथारीवाल्यांच्या अंगावर फिरवला टेम्पो

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर ः दिवाळी सणाच्या निमित्ताने दिवसभर मालाची विक्री करून बुट विक्रेते देवाची प्रार्थना करून उद्याही असाच व्यवसाय व्हावा अशी प्रार्थना करत रात्री फुटपाथवरच झोपी गेले परंतु काळाला ते मान्य नव्हते.

शहरातील चांदणी चौकाजवळ असलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोरील फूटपाथवर झोपलेल्या बुट विक्रेत्यांच्या अंगावर आयशर टॅम्पो फिरला. यात एक जण जागीच ठार तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. 

दरवर्षीच बुट विक्रेते दिवाळी सणा निमित्त नगर शहरात बुट विक्रीसाठी येत असतात. रस्त्याच्या कडेला असलेल्या फुटपाथवर आपली दुकाने थाटून मालाची विक्री दिवसभर करतात. त्यानंतर रात्री दुकाने आवरून तेथेच मुक्‍काम करतात हे अनेक वर्षांपासून त्यांचे नित्याचे ठरले आहे.

सालाबाद प्रमाणे यंदाही बुट विक्रेत्यांनी आपली दुकाने फुटपाथवर थाटली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही बुटाची विक्री यंदाही चांगली झाली. त्यामुळे विक्रेत्यांचे चेहरे आनंदी झाले होते. देवाची प्रार्थना करत उद्याही असाच व्यवसाय व्हावा असे म्हणत ते झोपी गेले मात्र नियतीला हे मान्य नव्हते. त्यांच्या अंगावर आज पहाटेच्या सुमारास टॅम्पो फिरला.

टॅम्पोने तीन बुट विक्रेत्यांना चिरडले. यात मेहताब शेख (वय 21, रा. उत्तरप्रदेश) याचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्या बरोबर असलेले जावेद शेख (वय 20), मुसाईद शेख (वय 25) हे जखमी झाले या शिवाय टॅम्पोमधील दोन जणेही जखमी झाले. जखमींवर नगरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या संदर्भात भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

भीती कायम 
पुढच्याला ठेच मागचा शहराना या म्हणी प्रमाणे महापालिकेने फूटपाथवर झोपणाऱ्या व विक्री करणाऱ्यांना मज्जाव करून आगामी काळात अशा घटना घडू नयेत यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. आज एकाचा बळी गेला आणखीही अनेक बळी जाण्याची भीती नगरकरांतून व्यक्‍त होते आहे.