
अहिल्यानगर : मे महिन्यात सर्वत्र झालेल्या जोरदार अवकाळी पावसाने रान आबादानी झालंय. मान्सूननेही वेळेवर हजेरी लावल्याने बळीराजाने चाड्यावर मूठ धरलीय. दुष्काळी पाणलोट क्षेत्र असलेली सीनाही दुथडी वाहतेय. भीमा, गोदावरी, मुळा, प्रवरा, घोड नद्याही वाहत्या झाल्यात. सर्वत्र हिरवं वातावरण आहे. यंदा खरिपाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे. मात्र, रोजच्या पावसाने वाफसा मोड होतेय. त्यामुळे शेतकरी वाफशाची वाट पाहत आहेत.