esakal | 'मुळा'ने ग्रामीण मुला- मुलींच्या स्वप्नांना बळ दिले : डॉ. मोहन खताळ 
sakal

बोलून बातमी शोधा

Help by giving a check of one lakh to the father of the student who was electrocuted

उच्च शिक्षणाच्या सोयी- सुविधांचा अभाव असलेल्या माका येथे मुळा एज्युकेशन सोसायटीने उच्च महाविद्यालय सुरू करून ग्रामीण भागातील मुला- मुलींच्या स्वप्नांना बळ दिले, असे प्रतिपादन पुणे येथील शिक्षण सहसंचालक (उच्च शिक्षण विभाग) डॉ. मोहन खताळ यांनी केले.

'मुळा'ने ग्रामीण मुला- मुलींच्या स्वप्नांना बळ दिले : डॉ. मोहन खताळ 

sakal_logo
By
सुनील गर्जे

नेवासे (अहमदनगर) : उच्च शिक्षणाच्या सोयी- सुविधांचा अभाव असलेल्या माका येथे मुळा एज्युकेशन सोसायटीने उच्च महाविद्यालय सुरू करून ग्रामीण भागातील मुला- मुलींच्या स्वप्नांना बळ दिले,  असे प्रतिपादन पुणे येथील शिक्षण सहसंचालक (उच्च शिक्षण विभाग) डॉ. मोहन खताळ यांनी केले. 

माका (ता. नेवासे)  येथील मुळा एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील गणेश लोंढे यांचा वीज अंगावर पडून झालेल्या अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याच्या पालकाला एक लाख रुपये विमा रकमेचा धनादेश डॉ. खताळ यांच्या हस्ते देण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. 'मुळा'चे सहसचिव डॉ. विनायक देशमुख,  सोनई'चे प्राचार्य डॉ. शंकर लावरे,  माका महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भानुदास चोपडे,

उपप्राचार्य वसंत पुंड, विद्यार्थी मंडळ अधिकारी  मंदार कुलकर्णी यावेळी उपस्थित होते.
प्रास्ताविक प्राचार्य डॉ. भानुदास चोपडे यांनी केले. यावेळी  अमोल दहातोंडे, अजहर शेख,  ज्ञानेश्वर पादर,  राहुल चांदेकर   संपत घुले,  हनुमंत मदने आदी उपस्थित होते.
माका येथील  कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय विद्यार्थी कल्याण मंडळ अंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व ओरीयंटल इन्शुरन्स कंपनी यांच्या माध्यमातून नैसर्गिक आपत्तीअंतर्गत देण्यात आलेला एक लाख रुपयांचा धनादेश  मृत विद्यार्थ्याचे  पालक रामनाथ  लोंढे यांनी स्वीकारला. यासाठी विद्यार्थी कल्याण मंडळ अधिकारी प्रा.  मंदार कुलकर्णी  यांनी विद्यापीठाकडे पाठपुरावा केला होता. 

विद्यार्थी योजनांचा लाभ घ्या : प्रशांत गडाख
विद्यापीठाच्या विविध विद्यार्थी हिताच्या योजनांचा लाभ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना  मिळावा यासाठी सर्व महाविद्यालयांनी प्रयत्न करून योजनांचा लाभ घ्यावा. त्यासाठी माझी  सर्वोतोपरी मदत राहील. असे  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा माजी सदस्य प्रशांत पाटील गडाख म्हणाले. 

संपादन : अशोक मुरुमकर

loading image
go to top