esakal | Video : मजूरीसाठी पैसे नाहीत... त्यांची अवस्था पाहून मुलं शेतात...
sakal

बोलून बातमी शोधा

Help the parents of the students in the field as the school is closed

कोरोनामुळे शाळा बंद आहेत. पाऊस सुरु असल्याने शेतकरी कामात व्यग्र आहेत. सरकारने खावटी बंद केली हिरडा खरेदी केला नाही. त्यामुळे आदिवासी भागातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे. व्याजाने पैसे घेऊन त्याने बियाणे खते घेतली आहे. मजूरीसाठी पैसे नाहीत.

Video : मजूरीसाठी पैसे नाहीत... त्यांची अवस्था पाहून मुलं शेतात...

sakal_logo
By
शांताराम काळे

अकोले (अहमदनगर) : कोरोनामुळे शाळा बंद आहेत. पाऊस सुरु असल्याने शेतकरी कामात व्यग्र आहेत. सरकारने खावटी बंद केली हिरडा खरेदी केला नाही. त्यामुळे आदिवासी भागातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे. व्याजाने पैसे घेऊन त्याने बियाणे खते घेतली आहे. मजूरीसाठी पैसे नाहीत. त्याची ही अवस्था पाहून शाळेतून घरी बसलेले विद्यार्थी आपल्या आई- वडिलांना मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. गुढघाभर गाळात उतरून भाताची अवनी करताना तर कधी औत हाकताना व गुरे वळताना शाळकरी मुले ठिकठिकाणी दिसत आहे. नको आम्हाला शाळा आमची शेती शाळा बरी अकोले तालुक्यात पाऊस सुरु असून शेतकरी आवणी उरकण्याचा मागे आहे.

आश्रमशाळा, माध्यमिक, जिल्हापरिषद शाळा कोरोनामुळे बंद आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थी आपल्या गावी आले आहेत. दर पावसाळ्यात शाळेत रमणारी ही चिमुरडी आता मजूर नसल्याने व मजुरी देणे परवडत नसल्याने आपल्या पालकांना शेतीला मदत व्हावी म्हणून सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शेतात राबताना दिसत आहे. पिंपरकणे येथील शिवारात दिनेश निवृत्ती पिचड नववी, स्वप्नील हिरामण पिचड आठवी, मयूर पिचड सातवी, धीरज पिचड १० वी, गंगाराम पिचड ११ वी, शिवराम पिचड पाचवी शिकत असलेले मुले गुडघाभर गाळात घुसून इंद्रायणी भाताचे रोपे लावताना दिसले तर शेलविहिरे येथे अमोल लोखंडे, रोहन लोखंडे, अनिता लोखंडे हे शालेय विद्यार्थी गुरे व शेळ्या वळताना दिसली तर आश्रमशाळेतील अश्विनी आढळ ही हातात पुस्तक घेऊन शेळ्यामागे जाताना दिसली. अडचणीच्या काळात आपल्या आई- वडील कुटुंबाला हातभार लागावा म्हणून ही मुले धडपड करताना दिसत होती. काही निवृत्ती किसन पिचड (शेतकरी पिंपरकने), खावटी धान्य नाही, हिरडा खरेदी बंद त्यामुळे शेतीला बियाणे व खते घेणे परवडेना मग व्याजाने व हातउसने घेऊन बियाणे आणली तर शाळां बंद असल्याने आश्रमशाळेतील मुले घरी अली आहेत. रोजच्या जगण्यासाठी धडपड करावी लागते. मुले शेती कमला व जनावरे सांभाळण्यासाठी मदत करता मात्र सरकारी मदत अजूनही मिळाली नाही. धीरज पिचड (विधार्थी) शाळा बंद आहेत. आम्ही वडिलांना शेतीच्या कामाला मदत करण्यासाठी शेतीवर आलो आहोत. आवणीचे काम आम्हाला जमते. तर अश्विनीने आपण शेळ्या वळतो व अभ्यासही करतो तिच्या हातात इयत्ता दहावीचे मराठीचे पुस्तक होते.

संपादन : अशोक मुरुमकर

loading image