
कऱ्हाड : यशवंतनगर (ता. कऱ्हाड) येथील सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या निवास थोरात यांचा अर्ज निवडणुक निर्णय अधिकारी संजयकुमार सुद्रीक यांनी अवैध ठरवला होता. त्यावर त्यांनी प्रादेशिक साखर सहसंचालक निलीमा गायकवाड यांच्याकडे अपिल दाखल केले होते. त्यांनी थोरात यांचा अर्ज वैध ठरवला. त्यावर हरकत घेवुन थोरात यांच्या निकालाला आव्हाण देणारी याची उच्च न्यायालयात दाखल करण्यात आला होता त्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने आज दिला आहे. उच्च न्यायालयाने निवडणुक निर्णय़ अधिकारी यांचा निकाल कायम ठेवला आहे. त्यामुळे थोरात यांच्यासह भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, कार्यकारणी सदस्य रामकृष्ण वेताळ यांच्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सह्याद्री शेतकरी परिवर्तन पॅनेलला मोठा धक्का बसला आहे.