
अहिल्यानगर : छत्रपती संभाजीनगर महामार्गावर ट्रकचालकांना चाकूने हल्ला करत लुटणाऱ्या चार जणांच्या टोळीला एमआयडीसी पोलिसांनी १२ तासांत जेरबंद केले आहे. चौघांकडून ७५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी धीरज ऊर्फ जॉकी जॉन आवारे (वय १९, रा. गणेश चौक, बोल्हेगाव फाटा) हा म्होरक्या असून, त्याच्या टोळीत तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे, त्यांनाही ताब्यात घेतले आहे.