Ahilyanagar Crime : कारने दहा दुचाकींना उडविले; चार जणा जखमी, युवकांकडून गाडीचा थरारक पाठलाग
रात्री जखमी कारचालकास पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यास औषधोपचार करण्यासाठी रुग्णालयात सोडले. नुकसान झालेल्या व्यक्ती अथवा जखमींपैकी कुणीच तक्रार दिली नसल्याने पोलिस ठाण्यात आज सायंकाळपर्यंत कुठलाही गुन्हा दाखल झालेला नव्हता.
सोनई : लांडेवाडी रस्त्याने आलेल्या एका लाल रंगाच्या कारने छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुकानासमोर लावलेल्या दोन मोटारसायकली उडवल्यानंतर चालक गावातील रस्त्याने अधिकच सुसाट वेगात जात त्याने अजून सात ते आठ मोटारसायकलींना उडविले.