
नगर तालुका : हिवरे बाजारने जलसंधारण व ग्राम समृद्ध योजनेतून देशापुढे नवा आदर्श उभा केला आहे. राज्यातील समृद्ध असलेल्या हिवरे बाजारला आता राज्यातील प्रथम आरोग्यसमृद्ध गाव होण्याचा मान मिळणार आहे, असे प्रतिपादन आयुष्मान भारत मिशन व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी केले.