esakal | सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत नगर जिल्ह्यात भाजपकडून वीज बिलाची होळी
sakal

बोलून बातमी शोधा

Holi of electricity bill from BJP in Nagar district shouting slogans against the government

राज्य सरकारने विजेचे बिल अवच्या सव्वा देऊन शब्द देऊनही वीज बिल माफ न केल्यामुळे आज शेतकऱ्यांना काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आली, असे उद्गार माजी आमदार वैभव पिचड यांनी अकोले वीज मंडळ कार्यालयाच्या समोर बोलताना काढले.

सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत नगर जिल्ह्यात भाजपकडून वीज बिलाची होळी

sakal_logo
By
शांताराम काळे

अकोले (अहमदनगर) : राज्य सरकारने विजेचे बिल अवच्या सव्वा देऊन शब्द देऊनही वीज बिल माफ न केल्यामुळे आज शेतकऱ्यांना काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आली, असे उद्गार माजी आमदार वैभव पिचड यांनी अकोले वीज मंडळ कार्यालयाच्या समोर बोलताना काढले. 

आज अकोले वीज मंडळावर शेतकरी व भाजप कार्यकर्त्यांनी मोर्चाने जाऊन वीज कार्यालयासमोर वीज बिलाची होळी केली. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते जालिंदर वाकचौरे, गिरजाजी जाधव, रेशमा गोडसे, सभापती उर्मिला राऊत, उपसभापती दत्ता देशमुख, परबत नाईकवाडी, अशोक देशमुख, जिल्हा भाजप महिला अध्यक्ष सोनाली नाईकवाडी, तालुका अध्यक्ष सीताराम भांगरे, यशवंत अभाळे, राजेंद्र डवरे उपस्थित होते. प्रथम गोंधळ घालून वीज मंडळाचे कार्यकारी अभियंता बागुल यांना निवेदन देण्यात आले. 

प्रसंगी बोलताना जालिंदर वाकचौरे यांनी बोलताना राज्याचे तीन पक्षाचे आघाडी सरकार शेतकऱ्यांना वीज बिल देऊन कोरोना संकटात त्यांना बिलाचा शॉक देत आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या अन्नात मीठ कलवण्याचे काम होत आहे. तालुक्याचे आमदार प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न नाही तर चमकोगिरी करत आहे. यावेळी अशोक देशमुख, गिर जजी जाधव, सीताराम भांगरे, सोनाली नाईकवाडी यांनी सरकारविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करून सरकारविरोधात घोषणा दिल्या. तर शेतकऱ्यांचे वीज बिल अगोदर माफ करा मात्र वीज कट केले तर शेतकरी हातात काठी घेतल्याशिवाय राहणार नाही.

संपादन : अशोक मुरुमकर