esakal | पत्नी व सून शेळ्या बांधण्यासाठी घराबेहर गेल्या होत्या, म्हणून त्या बचावल्या नाही तर त्याही...
sakal

बोलून बातमी शोधा

House collapsed due to rain in Dhengar Akhegaon in Shevgaon taluka

पावसामुळे घराचे छत कोसळून त्याखाली सापडलेल्या एका जणाचे जागीच मृत्यू झाला. डोंगर आखेगाव (ता. शेवगाव) येथे शनिवार (ता. १९) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. नानाभाऊ शंकर कोल्हे (वय ८०) असे मृताचे नाव आहे.

पत्नी व सून शेळ्या बांधण्यासाठी घराबेहर गेल्या होत्या, म्हणून त्या बचावल्या नाही तर त्याही...

sakal_logo
By
सचिन सातपुते

शेवगाव (अहमदनगर) : पावसामुळे घराचे छत कोसळून त्याखाली सापडलेल्या एका जणाचे जागीच मृत्यू झाला. डोंगर आखेगाव (ता. शेवगाव) येथे शनिवार (ता. १९) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. नानाभाऊ शंकर कोल्हे (वय ८०) असे मृताचे नाव आहे.

तालुक्यात दोन दिवसापासून जोरदार पाऊस सुरु आहे. पावसामुळे अनेक घरांना ही गळती लागली आहे. डोगर आखेगाव येथील नानाभाऊ कोल्हे यांचे मातीचे खण असलेले घर पावसामुळे शनिवारी पहाटे केसळले. त्याखाली कोल्हे दबले गेले. घर कोसळताच जवळपास राहणाऱ्यांनी धाव घेवून बचाव कार्य सुरु केले. लाकुड, मातीच्या ढिगाऱ्याखालील अडकलेल्या कोल्हे यांना बाहेर काढण्यासाठी गावकऱ्यांनी प्रयत्न केले. मात्र ढिगारा जास्त असल्याने जेसीबी मशिनच्या सहाय्याने तो हटविण्यात आला. मात्र तोपर्यंत कोल्हे यांचा गुदमरून मृत्यू झाला. कोल्हे यांच्या पत्नी कौसाबाई व सुन सिताबाई या शेळया बांधण्यासाठी बाहेर गेल्याने त्या थोडक्यात बचावल्या. 

पोलिस पाटील लक्ष्मण केदार यांनी याबाबत शेवगाव पोलिस ठाण्याला खबर दिली. पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांनी त्वरीत घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर त्यांचे शेवगाव येथील ग्रामीण रुग्णालय श्वविच्छेदन केल्यानंतर त्यांच्यावर आखेगाव येथे अत्यंसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी अकस्मात मृत्यची नोंद केली आहे. कोल्हे यांच्या मागे पती, एक मुलगा, सुन, नातंडे असा परिवार आहे.

संपादन : अशोक मुरुमकर

loading image