

पाथर्डी : शहरातील कसबा विभागात असलेल्या एका घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरांनी घरातील सत्तर हजारांची रोख रक्कम व अडीच तोळे सोने लंपास केले, तसेच शेजारील बंद घराचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्नही चोरांनी केला. या सर्व घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे.