esakal | HSC Result 2021 : नगर जिल्ह्याचा बारावीच्या निकालाचा टक्का वाढला
sakal

बोलून बातमी शोधा

HSC Result 2021

HSC Result 2021 : नगर जिल्ह्याचा बारावीच्या निकालाचा टक्का वाढला

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

नगर : Ahmednagar HSC Result 2021 - राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल आज जाहीर झाला. मागील वर्षीच्या तुलनेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांत ७.८१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. नियमित विद्यार्थ्यांचा निकाल ९९.७८ टक्के, तर पुनर्परीक्षार्थींचा निकाल ९९.६३ टक्के लागला आहे.


कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या वर्षी दहावी व बारावीच्या परीक्षा झाल्या नाहीत. मूल्यमापनावरच निकाल जाहीर करण्यात आला आहे. आज बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल अकरावी व दहावीच्या गुणांचे मूल्यांकन करून जाहीर करण्यात आला आहे. मागील वर्षी जिल्ह्याचा बारावीचा निकाल ९१.९७ टक्के होता. त्यात यंदा वाढ झाली असून, या वर्षी तो ९९.७८ टक्के लागला आहे. यामध्ये जिल्ह्यातील ६१ हजार ९२१ विद्यार्थ्यांपैकी ६१ हजार ७८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये ३५ हजार २० मुले, तर २६ हजार ७६७ मुलींचा समावेश आहे. मुलांची टक्केवारी ९९.७४ असून, मुलींची ९९.८२ टक्के आहे. जिल्ह्यातून बारावीच्या पुनर्परीक्षेस जिल्ह्यातील दोन हजार ४३९ विद्यार्थी बसले होते. त्यांपैकी दोन हजार ४३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण निकाल ९९.६३ टक्के लागला आहे.


नियमित परीक्षार्थींचा निकाल

अकोले ः ९९.७७, जामखेड ः ९८.८१, कर्जत ः १००, कोपरगाव ः ९९.८४. नगर ः ९९.८५, नेवासे ः ९९.८४, पारनेर ः ९९.८६, पाथर्डी ः ९९.९१, राहाता ः ९९.९१, राहुरी ः ९९.९२, संगमनेर ः ९९.८५, शेवगाव ः ९९.५२, श्रीगोंदे ः ९९.९३, श्रीरामपूर ः ९९.६९ टक्के. कर्जत तालुक्याचा निकाल १०० टक्के लागला आहे.

उत्तीर्णांची शाखानिहाय टक्केवारी
विज्ञान शाखा ः ९९.८३, कला शाखा ः ९९.८३, वाणिज्य शाखा ः ९९.९७, किमान कौशल्य ः ९९.७२.

हेही वाचा: आई ती आईच! लेकरासाठी मातेचे बिबट्याशी दोन हात

अनुत्तीर्ण विद्यार्थिसंख्या

एकूण १३२ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. त्यांमध्ये ८८ मुले असून, ४६ मुली आहेत.
चौकट

उत्तीर्ण पुनर्परीक्षार्थींची टक्केवारी

अकोले ः ९९.४०, जामखेड ः १००, कर्जत ः १००, कोपरगाव ः १००, नगर ः ९९.७६. नेवासे ः १००, पारनेर ः १००, पाथर्डी ः ९८.५५, राहाता ः ९८.०७, राहुरी ः १००, संगमनेर ः १००, शेवगाव ः ९९.१३, श्रीगोंदे ः १००, श्रीरामपूर ः १००.

शाखानिहाय निकाल

विज्ञान शाखा ः ९८.७४, कला शाखा ः ९९.७६, वाणिज्य शाखा ः ९९.६६, किमान कौशल्य शाखा ः १०० टक्के.

अनुत्तीर्ण विद्यार्थिसंख्या

पुनर्परीक्षार्थींमध्ये एकूण नऊ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये आठ मुले व एका मुलीचा समावेश आहे.

हेही वाचा: 'भूसंपादनात कोणावरही अन्याय होणार नाही' - आमदार रोहित पवार

loading image
go to top