esakal | "नवरा फक्त आईलाच सांभाळतो"; भररागात पत्नीची पतीसह सासरच्यांना बेदम मारहाण
sakal

बोलून बातमी शोधा

wedding

पत्नीची सासरच्यांना बेदम मारहाण; 6 जणांविरोधात गुन्हा

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

राहुरी (जि.अहमदनगर) : नवरा त्याच्या आईला सांभाळतो. तिचेच सर्व काही ऐकतो. या रागातून पत्नीने माहेरच्या लोकांना आणून नवरा, दीर व वृद्ध सासूला गज व काठीने बेदम मारहाण केली. त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने बळजबरीने ओरबाडून नेले. घरातील किमती वस्तूंची तोडफोड केली. राहुरी फॅक्टरी येथे शुक्रवारी (ता. २३) सायंकाळी नीलेश अनिल लांडगे (रा. आदिनाथ वसाहत) यांच्या घरात वरील प्रकार घडला. काय घडले नेमके? (husband-complaint-filed-case-against-six-people-including-wife-jpd93)

पत्नीच्या माहेरच्यांकडून दमबाजी मारहाण

नीलेश लांडगे यांनी याबाबत फिर्याद दिली, त्यात म्हटले आहे की पत्नी सीमा व तिच्या माहेरच्या मंडळींनी घरात घुसून गजाने मारहाण केली. भाऊ व वृद्ध आईला लाथा-बुक्क्यांनी व काठीने मारहाण केली. आईच्या गळ्यातील पोत व माझ्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची साखळी बळजबरीने तोडून घेतली. घरातील संसारोपयोगी साहित्य, लाकडी कपाट, लोखंडी कपाटातील सामान काढून अस्ताव्यस्त फेकून दिले. टीव्ही व मोबाईल फोडून नुकसान केले. जिवे मारण्याची धमकी दिली. आईला सांभाळू नको, अशी दमबाजी मारहाण करताना आरोपींनी केली. पोलिस उपनिरीक्षक नीलेशकुमार वाघ तपास करीत आहेत.

पत्नीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा

राहुरी फॅक्टरी येथे शुक्रवारी (ता. २३) सायंकाळी साडेपाच वाजता नीलेश अनिल लांडगे (रा. आदिनाथ वसाहत) यांच्या घरात वरील प्रकार घडला. जितेंद्र नारायण भुजंगे, रवींद्र नारायण भुजंगे, नारायण बापूराव भुजंगे, वच्छला नारायण भुजंगे, सीमा नीलेश लांडगे व एक अनोळखी महिला (सर्व जण रा. नेकनूर, जि. बीड) अशी आरोपींची नावे आहेत.याप्रकरणी पतीच्या फिर्यादीवरून, पत्नीसह सहा जणांविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात मारहाण व लुटमारीचा गुन्हा नोंदविला.

हेही वाचा: ‘अर्बन’ बॅंकेच्या शाखा व्यवस्थापकाची आत्महत्या

हेही वाचा: नेवाशात भाजपअंतर्गत वाद उफाळला! माजी आमदारांवर गंभीर आरोप

loading image
go to top