पत्नीच्या खूनप्रकरणी पतीस जन्मठेप

श्रीगोंदे जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल
Husband sentenced to life imprisonment for wife's murder
Husband sentenced to life imprisonment for wife's murder

श्रीगोंदे - शंकर किशोर साळवे (वय २२, श्रीरामनगर, मिरजगाव, ता. कर्जत) याने पत्नीस जिवे मारल्याप्रकरणी येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एस. शेख यांनी खुनाच्या गुन्ह्याखाली जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यासोबत पाच हजार रुपयांचा दंड व तो न भरल्यास ६ महिने साध्या कैदेची अशी शिक्षा सुनावली.

नेहा ही (पोथरे, ता. करमाळा) येथील होती. तिचा आरोपी शंकर किशोर साळवे याच्याशी प्रेम विवाह झाला. लग्नानंतर मयत नेहा ही सासरी मिरजगाव येथे नांदण्यास गेली. काही दिवसांनी पती-पत्नीत वाद झाले. मयत नेहा व आरोपी शंकर यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. आरोपीने तिला मारहाण केली. यामध्ये नेहा मयत झाली होती.

नेहा हिचे बहिणीने तिच्या पतीविरुद्ध कर्जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन खुनाचा गुन्हा दाखल केला. सदर गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपींविरुद्ध पोलिस उपनिरीक्षक अमरजित मोरे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सदर खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश एम. एस. शेख यांच्या न्यायालयात झाली. खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने ७ साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील संगीता ढगे यांनी काम पाहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com