esakal | मी पोलिस अधिकारी आहे, तुमच्याकडच्या सगळ्या वस्तू काढून द्या...
sakal

बोलून बातमी शोधा

I am a police officer, give me all your belongings

13 ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी व पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असा सुमारे 50 हजारांचा ऐवज काढून घेतला. 

मी पोलिस अधिकारी आहे, तुमच्याकडच्या सगळ्या वस्तू काढून द्या...

sakal_logo
By
मार्तंड बुचुडे

पारनेर ः पोलीस अधिकारी असल्याचे सांगून तुमची तपासणी करावायाची आहे, असे म्हणत दशरथ उर्फ युवराज रामजी शिंगाडे यांच्या अंगावरील 13 ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी व पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असा सुमारे 50 हजारांचा ऐवज काढून घेतला. ही घटना जवळा येथे काल (ता. 17 ) रोजी सकाळी 11 वाजणेच्या सुमारास  घडली.

या बाबत माहिती अशी की, दशरथ उर्फ युवराज रामजी शिंगाडे (रा.  जवळा, हल्ली रा. म्हसे खुर्द) हे जवळा येथून मेडिकलमधून औषध घेऊन जवळा गावापासून जवळच असलेल्या पुनर्वसन वसाहतीत त्यांचे बंधू कुंडलिक शिंगाडे यांच्याकडे जात असताना एक काळ्या रंगाची दुचाकीवरून दोघेजण आले. त्यांनी आम्ही पोलीस आहोत, असे सांगून त्यांची अंगझडती घेतली.

तुमच्या वस्तू तुम्हाला परत देतो, असे सांगून झडती घेतली. त्याला त्याच्या सर्व वस्तू परत दिल्या. मात्र यात हातचलाखी करीत शिंगाडे यांची  सोन्याची चैन व अंगठी असा सुमारे 50 हजारांचा ऐवज घेऊन भामट्यांनी घेऊन पोबारा केला.

या बाबत शिंगाडे यांनी पारनेर पोलीस ठाण्यात आज्ञात चोरट्यांविरोधात फिर्याद दिली आहे. पोलिस असल्याचे सांगून अशा प्रकारे अनेकांची फसवणूक झाली आहे.

संपादन - अशोक निंबाळकर