
पारनेर : मी कधीच काही बोलत नाही. मात्र न बोलतासुद्धा सर्व काही करत असतो. माझे काम येथील कार्यकर्त्यांना संरक्षण देण्याचे व त्यांच्या भावना उच्चस्तरीय पातळीवर पोहचविण्याचे आहे. मी कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करतो. हे काम करता आले, तरच ती व्यक्ती नेता होऊ शकते, असे प्रतिपादन माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केले.