इब्टाच्या बहुजन मंडळाच्या वतीने संविधानदिनानिमित्त जिल्हास्तरीय ऑनलाइनस्पर्धेचे आयोजन

शांताराम काळे 
Wednesday, 18 November 2020

आयडियल बहुजन टीचर्स असोसिएशन व बहुजन मंडळ अहमदनगर या शिक्षकांच्या संघटनेच्या वतीने येणाऱ्या संविधान दिनानिमित्त विद्यार्थी व शिक्षकांसाठी जिल्हास्तरीय खुली ऑनलाइन वक्तृत्व, काव्यगायन आणि निबंध स्पर्धेचे आयोजन केले असल्याचे बहुजन मंडळाचे कार्याध्यक्ष सुहास पवार आणि राहाता तालुकाध्यक्ष सतिष मुंतोडे यांनी जाहीर केले.

अकोले (अहमदनगर) : आयडियल बहुजन टीचर्स असोसिएशन व बहुजन मंडळ अहमदनगर या शिक्षकांच्या संघटनेच्या वतीने येणाऱ्या संविधान दिनानिमित्त विद्यार्थी व शिक्षकांसाठी जिल्हास्तरीय खुली ऑनलाइन वक्तृत्व, काव्यगायन आणि निबंध स्पर्धेचे आयोजन केले असल्याचे बहुजन मंडळाचे कार्याध्यक्ष सुहास पवार आणि राहाता तालुकाध्यक्ष सतिष मुंतोडे यांनी जाहीर केले.

यावेळी बहुजन मंडळ जिल्हाध्यक्ष एकनाथ व्यवहारे यांनी जिल्ह्यातील इयत्ता तिसरी ते आठवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थी आणि जिल्हा परिषदेत कार्यरत असणाऱ्या सर्व शिक्षक व शिक्षिका यांच्यासाठी विषय स्पष्ट केले. 'कधी जाईल कॊरोना', 'मला शाळेत जायचंय', 'मला नको फटाके' , 'तर हवी पुस्तके', 'संविधान गरज' , 'कर्तव्य आणि अंमलबजावणीतील माझी भूमिका' , तसेच 'कॊरोना नंतर शाळा शिक्षक व पालक' आणि प्रशासनाकडून विद्यार्थ्यांच्या अपेक्षा' आणि 'राष्ट्रीय शिक्षण धोरण अंमलबजावणीत होणारी फलनिष्पत्ती' अशा विविध सामाजिक व शिक्षण प्रणालीत गरजेच्या अशा विषयावर विद्यार्थी व शिक्षकांकरिता वक्तृत्व निबंध व काव्यगायन ऑनलाइन स्पर्धा आयोजित केल्याचे सांगितले.

या स्पर्धेला जिल्ह्यात उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे सांगताना जिल्हा उच्चाधिकार समिती उपाध्यक्ष अरुण मोकळ यांनी सर्व स्पर्धकांनी (दि. 20 नोव्हेंबर) अखेर आपल्या प्रवेशिका व व्हिडीओ  संयोजकांना पाठवण्याचे आवाहन केले. स्पर्धेचा निकाल संविधान दिनी 26 नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येणार असून महात्मा फुले पुण्यतिथी (दि. 28 नोव्हेंबर) रोजी रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक जिल्ह्याचे मान्यवर पदाधिकारी यांच्या हस्ते समारंभपूर्वक पारितोषिक वितरण कार्यक्रम होणार असल्याची माहिती इब्टाचे जिल्हाध्यक्ष गौतम मिसाळ यांनी स्पष्ट केले.

स्पर्धेची तांत्रिक बाजू ,संकलन व नियोजन जिल्हा संघटक नानासाहेब राजभोज, उपाध्यक्ष अरुण मोकळ, जिल्हा कार्याध्यक्ष सुहास पवार, तालुकाध्यक्ष सतीश मुंतोडे, कोषाध्यक्ष रविंद्र रुपवते हे सांभाळत असून स्पर्धा आयोजन व संयोजन कामी विभागीय अध्यक्ष नवनाथअडसूळ, उच्चाधिकारसमितीचे अध्यक्ष भागवत लेंडे, जिल्हासचिव अशोक नेवसे, जिल्हा कार्याध्यक्ष विजय काटकर, श्रीम कमल भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सुभाष भिंगारदिवे, रवींद्र होले, संतोषकुमार शिंदे, विलास गव्हाणे, अविनाश बोधक, राजेंद्र कडलग, मिथुन गायकवाड, मिलिंद खंडिझोड, मारुती वाघ, रमेश भोसले, दत्ता खंडिझोड, शिवाजी गायकवाड, वेरोनिका अवसरमल, समता मोकळ, जयश्री जगताप आदी प्रयत्नशील आहेत. तरी जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी व शिक्षक बंधू भगिनी यांनी स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन इब्टा बहुजन मंडळ व  संघटनेच्या वतीने करण्यात आलेले आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ibtas Bahujan Mandal has organized a district level online competition on the occasion of Constitution Day