
राष्ट्रीय महामार्गाच्या अपुर्ण कामामुळे रस्त्यावरील धुळीमुळे अनेकांना श्वसनाचे आजार बळावले आहेत.
पाथर्डी (अहमदनगर) : राष्ट्रीय महामार्गाच्या अपुर्ण कामामुळे रस्त्यावरील धुळीमुळे अनेकांना श्वसनाचे आजार बळावले आहेत. रस्त्याच्या कडेला असणारे दुकानदार व रस्त्याने जाणारे- येणारे वाहनधारक यामुळे त्रस्त आहेत.
अपघातही वाढले आहेत. तिसगाव शहरातील व पाथर्डी ते नगर रस्त्याचे काम तातडीने सुरु करुन वेगाने पुर्ण करण्याच्या मागणीसाठी भाऊसाहेब लवांडे व तिसगावच्या व्यापा-यांनी तहसिलदार शाम वाडकर यांची भेट घेतली.
ठेकेदार कंपनीच्या संचलकास व राष्ट्रीय महामार्गाच्या अधिका-यांना बोलावुन घेवुन काम सुरु करण्याच्या सुचना देतो असे वाडकर यांनी सांगितले. तिसगाव शहरातील वेशीपासुन ते एसटीस्टँड पर्यंतचा रस्त्याचे काम राहीलेले आहे. अनेक ठिकाणी काम अपुर्ण ठेवुन ठेकेदाराने काम बंद केले आहे. गेल्या चार वर्षापासुन रस्त्याचे काम सुरु आहे. पहीला ठेकेदार बदलला आतातरी वेगात काम होईल असे नागरीकांना वाटले होते.मात्र पहीलाच बरा होता अशी परस्थीती झाली आहे. आठ महीन्यात नवीन ठेकेदाराने काम कऱण्याचे नाटक केले. धुळीमुळे नागरीक व वाहनधारक हतबल झाले आहेत. रोज अपघात होत आहेत. अनेकांचे जीव गेले काहीला अंपगत्व आले.
सात दिवसात राष्ट्रीय महामार्गाचे तिसगावमधील काम सुरु झाले नाही तर 14 डिसेंबर 2020 ला तिसगाव येथे रस्तोरोको अंदोलन करणार असल्याचे लवांडे यांनी सांगितले. यावेळी शेख बाबा पुढारी, चांद तांबोळी, वसीम सैय्यद, अखिल लवांडे, कदिर पठाण , आतिक शेख, राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाचे पाथर्डी तालुकाध्यक्ष अंबादास शिंदे, नौशाद दफेफार , सचिन साळवे, आमीनभाई बारामतीवाले उपस्थित होते. मी महामार्गाच्या अधिका-यांशी चर्चा करतो व काम सुरु करण्याच्या सुचना देतो असे वाडकर यांनी ग्रामस्थांना सांगितले.
संपादन : अशोक मुरुमकर