
श्रीरामपूर : पुण्यात स्थायिक असलेल डॉक्टरांचा श्रीरामपूर शहरात प्लॉट होता. तो पाहण्यासाठी ते आले असता त्या ठिकाणी त्यांना इमारत बांधल्याचे आढळून आले. त्यांनी भूमिअभिलेख कार्यालयात चौकशी केली असता खोटे कागदपत्र सादर करून हा प्लॉट आपला असल्याचे भासवित त्याची दोनदा विक्री केल्याचे आढळून आले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चौघा जणांविरोधात गुन्हा दाखल केला.