esakal | सोनईत व्यंकटेश देवस्थानच्या ईनामी जमिनीची बेकायदा खरेदी
sakal

बोलून बातमी शोधा

Illegal purchase of reward land of Venkatesh Devasthan in Sonai

सोनई (ता. नेवासे) येथील गट नंबर १५७ मधील व्यंकटेश देवस्थान ईनामी वर्ग तीनची जमीन वर्ग दोन दाखवून बेकायदा खरेदी- विक्री प्रकार झाला आहे.

सोनईत व्यंकटेश देवस्थानच्या ईनामी जमिनीची बेकायदा खरेदी

sakal_logo
By
विनायक दरंदले

सोनई (अहमदनगर) : सोनई (ता. नेवासे) येथील गट नंबर १५७ मधील व्यंकटेश देवस्थान ईनामी वर्ग तीनची जमीन वर्ग दोन दाखवून बेकायदा खरेदी- विक्री प्रकार झाला आहे. याप्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकारी व खरेदी- विक्री करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

नेवासे येथील माहिती अधिकाराबाबत नेहमी सजग असलेल्या काकासाहेब बाजीराव गायके यांनी या गैरव्यवहारबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे आज तक्रारीचे निवेदन दिले आहे. ईनामी जमीन असताना ती वर्ग दोन दाखवत ३२ एम प्रमाणपत्र नोंदवुन १५७ गटातील ५७ आरची खरेदी झाली आहे, असे निवेदनात नमूद केले आहे.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
जमिन नेवासा तहसिलदार यांचेसह इतर अधिकारी व दुय्यम निबंधक कार्यालय ,नेवासा यांनी बनावट कागदपत्र देऊन ६ फेब्रुवारीला दस्त क्रमांक ५२८ ने खरेदी केलेली आहे. कुळकायदा अहमदनगर यांनी माहिती अधिकारात दिलेल्या माहितीवरुन सदरच्या क्षेत्रातील देवस्थान जमीन वर्ग तीन असुन सदरची जमिन एका महिलेच्या नावावर आहे. बेकायदेशीर व बनावट खरेदी करुन घेणारे  सोनई येथील एक सेवानिवृत्त कर्मचारी आहेत.

खरेदी देणारे नेवासे तहसीलदार तर साक्षीदार पानसवाडी येथील आहेत. नेवासेचे तत्कालीन दुय्यम निबंधक यांनी हे खरेदी दस्तावेज तयार केलेला आहे. सदर जमीन खरेदी-विक्री प्रकरणास जिल्हाधिकारी कार्यालयाने पुर्व परवानगी दिली असल्यास त्याची सत्यप्रत मिळावी. याप्रकरणाची योग्य चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा सदर अधिकारी व लोकांविरुध्द न्यायालयात  मला खटला चालविण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी गायके यांनी निवेदनात केली आहे.

संपादन : अशोक मुरुमकर

loading image