exam
sakal
पारनेर - अहिल्यानगर जिल्ह्यात केंद्र पुरस्कृत उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षा उद्या रविवारी (ता. 25) होणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगरचे आनंद भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रपुरस्कृत उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम राबविला जात आहे.