
अहिल्यानगर : शहरात शासननिणर्यानुसार प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० राबविण्यात येत आहे. प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० अंतर्गत चार घटकांचा समावेश आहे. नागरिकांना परवडणाऱ्या किमतीत घरकुले उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. स्वतःच्या जागेत घर बांधण्यासाठीही अनुदान उपलब्ध होणार आहे. पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे सोबत घेवून महानगरपालिकेच्या प्रकल्प विभागात संपर्क साधून अर्ज करावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.