दूध भेसळ रोखण्यासाठी सरकारने हाती घेतलेल्या मोहीमेची अंमलबजावणी काटकोर व्हावी

सनी सोनावळे
Friday, 14 August 2020

राज्याचे दुग्ध विकास मंत्री सुनिल केदार व राज्यमंञी दत्ता भरणे यांनी दुध दरात सुधारणा व्हावी यासाठीच्या उपायांचा एक भाग म्हणून भेसळयुक्त दुधावर छापे टाकण्याची मोहिम हाती घेणार असल्याचे सांगितले आहे.

टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : राज्याचे दुग्ध विकास मंत्री सुनिल केदार व राज्यमंञी दत्ता भरणे यांनी दुध दरात सुधारणा व्हावी यासाठीच्या उपायांचा एक भाग म्हणून भेसळयुक्त दुधावर छापे टाकण्याची मोहिम हाती घेणार असल्याचे सांगितले आहे.

दुधात होणाऱ्या भेसळी विरोधात दुग्धविकास आणि अन्न व औषध प्रशासन विभाग समन्वयाने कारवाई करणार असुन प्रमाणित नसलेल्या दुधात निळ टाकण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सरकारने हाती घेतलेल्या या मोहीमेची अंमलबजावणी काटेकोर व्हावी यात नुसता दिखाऊपणा व जुजबी कारवाई नको आसे सरकारच्या निर्णयावर शेतकरी नेते अनिल देठे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

'सकाळ' शी बोलताना देठे म्हणाले ,राज्यात दुध दरवाढीच्या मागणीसाठी 1 ऑगस्ट पासुन विविध शेतकरी संघटना व विरोधी पक्षांचे आंदोलने सुरू आहेत.या आंदोलनात संघटनेने भेसळयुक्त दुधाबाबत कारवाई करण्याच्या मागणीला सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे ही स्वागतार्ह बाब आहे.

दुध खरेदीदरात प्रतीलीटर 32 रूपयांवरून थेट 17 ते 18 रुपयांपर्यंत घसरण झाली.यामुळे दुध उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असल्याने राज्यातील विविध शेतकरी संघटनांनी व विरोधी पक्षांनी आंदोलनात्मक पविञा घेत राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे.त्या पार्श्वभूमीवर दुग्धविकास विभागाने दुध भेसळ रोखण्यासाठी घेतलेल्या छापे टाकण्याच्या भुमिकेचे

आम्ही स्वागत करत आहोत.हि मोहिम नि:पक्षपणे व प्रामाणिकपणे राबविल्यास भेसळयुक्त दूध मोठ्या प्रमाणावर कमी होऊन अतिरिक्त दुधाचा प्रश्न हि संपुष्टात येऊन दुधाचे काही प्रमाणात दर देखील वाढतील .असा विश्वास देठे यांनी व्यक्त केला आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The implementation of the campaign undertaken by the government to prevent adulteration of milk should be strict