वाळूचोरांवर कारवाईसाठी तहसीलदार नदीकाठी मुक्कामी!

श्रीगोंदा तालुक्यात चर्चेला उधाण
file photo
file photo
Updated on

श्रीगोंदे : वरिष्ठांकडून आलेल्या आदेशाचे पालन करीत श्रीगोंद्याचे तहसीलदार प्रदीपकुमार पवार (shrigonda tahashildar pradeepkumar pawar) पथक घेवून घोड नदीपात्रातील म्हसे येथे कारवाईसाठी रात्री मुक्कामास गेले. विशेष म्हणजे रात्रभर नदीकाठी मुक्काम तर केलाच शिवाय सकाळी उशिरापर्यंत तेथेच ठाण मांडून राहिले. शेवटी कारवाई न करताच त्यांना परतावे लागले. (In Shrigonda taluka, the tehsildar stopped at the river at night for action)

file photo
ढील दिली, महागात पडली! पुन्हा नगर शहरात कडक लॉकडाउन

घोड नदीपात्रातील अनेक गावात बिनधास्त वाळूचोरी सुरू आहे. या विरोधात थेट महसूल मंत्र्यांच्या कार्यालयात तक्रार गेल्याची माहिती आहे. त्यानंतर महसूलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत तहसीलदार पवार यांना निरोप आला, की तातडीने माठ, म्हसे, वडगाव शिंदोडीतील वाळू चोरांविरुध्द कारवाई करावी. पवार यांनी पाच तलाठी, एक पोलिस कर्मचारी घेवून म्हसे गाव गाठले.

तेथे गेल्यावर करावाईचे नियोजनही सुरू केले. पवार पथकासोबत रात्रभर म्हसे येथे नदीकाठी एका ठिकाणी मुक्कामी थांबले. सकाळीही उशिरापर्यंत ते तेथेच थांबल्याची माहिती आहे. मात्र, कारवाई झाली नाही आणि वाळूचोरीही बंद झाली नाही.

पवार यांना कारवाईचे आदेश वरिष्ठांकडून आले होते. त्यामुळे त्यांना कारवाई करावीच लागणार होती. मात्र, त्यांनी कारवाई न केल्याने त्यांना थांबण्याचे आदेश नेमके कुणी दिले व ते मुक्‍कामी का थांबले याची उलटसुलट चर्चा आहे. याबाबत पवार यांना विचारले असता, त्यांनी बोलण्यास नकार दिला. (In Shrigonda taluka, the tehsildar stopped at the river at night for action)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com