esakal | शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीज देण्याचा प्रयोग सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

Inauguration of road in Rahuri taluka by Minister Prajakt Tanpure

राज्य सरकारने नवीन कृषी धोरणात सौर ऊर्जा प्रकल्पांना प्राधान्य दिले आहे.

शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीज देण्याचा प्रयोग सुरु

sakal_logo
By
विलास कुलकर्णी

राहुरी (अहमदनगर) : राज्य सरकारने नवीन कृषी धोरणात सौर ऊर्जा प्रकल्पांना प्राधान्य दिले आहे.  मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत कार्यान्वित सौरऊर्जा प्रकल्पांच्या ठिकाणी कृषी पंपाचे भार असलेल्या राज्यातील ६८ उच्चदाब वीज वाहिन्यांवर प्रायोगिक तत्त्वावर शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीज देण्यास राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त २ ऑक्टोबरपासून सुरुवात केली, असे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.

राहुरी खुर्द येथे मुळा नदीकाठी घाट बांधून स्मशानभूमीची विकास कामे, शनी शिंगणापुर रस्ता ते शेडगे वस्ती रस्त्याचे खडीकरण कामाचे उद्‌घाटनप्रसंगी मंत्री तनपुरे बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सरपंच पिरताजी चोपडे होते. राष्ट्रवादी महिला प्रदेश उपाध्यक्ष निर्मला मालपाणी, जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, बाळासाहेब हराळ, गोविंद मोकाटे, माजी सरपंच इमाम शेख, मच्छिंद्र पवार, तनपुरे कारखान्याचे संचालक नंदकुमार डोळस, अय्युब पठाण, भास्कर तोडमल, गंगाधर शेडगे, पुंजा आघाव, रामा तोडमल, मछिंद्र पाटोळे, बाबासाहेब शेडगे, ज्ञानदेव तोडमल, अशोक शेटे, बाबासाहेब धोंडे उपस्थित होते.

मंत्री तनपुरे म्हणाले, "राहुरी खुर्द येथील नागरिकांनी विधानसभा निवडणुकीत भरभरून मतदान केले. त्यातून उतराई होण्यासाठी विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही.  सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. राहुरी तालुक्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत वांबोरी, आरडगाव, चिंचोली, ताहराबाद येथे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्नशील आहे. राहुरी खुर्द येथे जागेची अडचण आहे. 

सौर ऊर्जा प्रकल्पासाठी एखाद्या शेतकऱ्याने जमीन उपलब्ध करून दिली. तर, त्यांना शासन मोबदला किंवा भाडे देण्यास तयार आहे. कोरोनामुळे यावर्षी निधीअभावी विकास कामे रखडली. कोरोनाचे संकट नियंत्रणात आल्यावर, मतदार संघात विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही." असेही मंत्री तनपुरे यांनी सांगितले. निर्मला मालपाणी यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले.

संपादन : अशोक मुरुमकर

loading image