विकास कामांमुळे गोरगावाचा चेहरामोहरा बदलला : विजय औटी

सनी सोनावळे 
Saturday, 24 October 2020

जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती बाबासाहेब तांबे यांच्या नेतृत्वाखाली गावामध्ये मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली.

टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती बाबासाहेब तांबे यांच्या नेतृत्वाखाली गावामध्ये मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली. सर्व स्तरातून विविध कामांसाठी निधी मंजुर करून लोकाभिमुख कामे करण्यात आली. विकासकामांमुळे गावाचा चेहरामोहरा बदलला आणि हे गाव मॉडेल व्हीलेज म्हणुन पुढे येत असल्याचे प्रतिपादन विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांनी व्यक्त केले.

गोरेगाव (ता. पारनेर) येथे पंचायत समितीचे सभापती यांच्या माध्यमातून मंजुर झालेला जलशुद्धीकरण प्रकल्प, सुसज्ज कारंजा, छत्रपती संभाजी महाराज उद्यान यासंह अन्य कामांचे उद्घाटन औटी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती गणेश शेळके होते. यावेळी जिल्हा परिषद कृषी व बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते, रामदास भोसले, अशोक कटारीया, विकास रोहकले, राहुल शिंदे, बाबासाहेब तांबे, शंकर नगरे, सरपंच सुमन तांबे उपस्थित होते. औटी म्हणाले, लोकांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा असणारा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारल्याने गावातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळणार आहे. यामुळे आजारांना देखील आळा बसेल.

सभापती शेळके म्हणाले, पंचायत समिती मार्फत लोकाभिमुख कामे करण्याकडे आमचा कल आहे. सर्वसामान्य जनतेला ज्याचा थेट उपयोग होईल ही कामे सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणुन हा जलशुद्धीकरण प्रकल्प, जेष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बाकडे ही देण्यात आली आहेत. यासंह वैयक्तिक लाभाच्या योजनाही मोठ्या प्रमाणात पंचायत समिती मार्फत राबविण्यात येत आहेत.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inauguration of water purification project at Goregaon in Parner taluka