esakal | निर्जंतुकीकरणासाठी या निवृत्त महसूल अधिका-याने बनविनली धूप
sakal

बोलून बातमी शोधा

dhup

लॉकडाऊनच्या काळात संधीचे सोने करीत जिद्द, चिकाटीच्या बळावर निवृत्त सर्कल अधिकारी दिनकर घोडके यांनी रसायनविरहीत "आरोग्य वर्धक धूप' विकसित करून करिष्मा केला आहे. ही धूप देशी गायीच्या शेणासह 33 वस्तूंपासून बनवली आहे. निर्जंतुकीकरणाबरोबरच मजबूत, टिकाऊ, बहुतांश आजारांवर रामबाण असल्याचा दावाही घोडके यांनी केला आहे. 

निर्जंतुकीकरणासाठी या निवृत्त महसूल अधिका-याने बनविनली धूप

sakal_logo
By
विनायक लांडे

नगर : लॉकडाऊनच्या काळात संधीचे सोने करीत जिद्द, चिकाटीच्या बळावर निवृत्त सर्कल अधिकारी दिनकर घोडके यांनी रसायनविरहीत "आरोग्य वर्धक धूप' विकसित करून करिष्मा केला आहे. ही धूप देशी गायीच्या शेणासह 33 वस्तूंपासून बनवली आहे. निर्जंतुकीकरणाबरोबरच मजबूत, टिकाऊ, बहुतांश आजारांवर रामबाण असल्याचा दावाही घोडके यांनी केला आहे. 

"आरोग्य वर्धक धूप'मध्ये सर्व प्रकारचे विषाणू नष्ट करण्याची क्षमता आहे. त्याचबरोबर धूपपासून वातावरण शुद्ध होऊन मोठ्या प्रमाणात प्राणवायू मिळतो. सर्दी, खोकला, ताप, वात, कफ, कावीळ, मधूमेह, क्षयरोग, सांधेदुखी, निमोनिया आदी आजारांपासून मुक्ती मिळण्यासाठी उपयुक्त आहे. घोडके यांनी सुरवातीला देशी गायीच्या शेणापासून बनविण्यास सुरवात केली. लॉकडाऊनच्या काळातील पहिले 24 दिवस प्रयोग करण्यात गेले. बहुतांश वेळा अपयश आले. परंतु, 25 व्या दिवशी "आरोग्य वर्धक धूप' बनविण्याचा संकल्प सिद्धीस गेला. धाकटा मुलगा मुकुंद घोडके याचीही मोलाची साथ मिळाली. त्याचबरोबर प्रचित वर्मा यांचेही सहकार्य लाभले. घर, कार्यालय, मॉल, उपहारगृहे आदी ठिकाणी या धूपचा वापर करता येणार आहे. 

यात आहे 33 प्रकारच्या वस्तू - औषधी वनस्पती -14 मसाल्याचे पदार्थ-11 समिधा-5 धान्य-1 तूप-1 शेण-1 

संधीचे सोने अन्‌ दक्षतेची नवी दिशा 
"कोरोना विषाणूच्या महामारीमुळे संपूर्ण जग घरातच बंदिस्त झाले. मात्र, कोरोनाच्या संकटाने दक्षतेची अन्‌ संधीचे सोने करण्याची नवी दिशा दिली. लॉकडाऊनच्या संकटात "आरोग्य वर्धक धूप' बनविण्याचा प्रयोग यशस्वी करता आला. त्यातून समाजाचे आरोग्य अबाधित राहण्यास मदत होणार आहे. निर्जंतुकीकरणासाठी धूप विकसीत करता आली असून याचे आत्मिक समाधान आहे,'' असा विश्‍वास निवृत्त सर्कल ऑफिसर दिनकर घोडके यांनी व्यक्त केला.

loading image