
पारनेर : गरीब व गरजू रुग्णांना पंतप्रधान राष्ट्रीय सहायता निधी अंतर्गत रुग्णांना तीन लाख रुपयांची मदत ही तुटपुंजी आहे. या रकमेत वाढ करण्यात यावी, तसेच लोकसभा सदस्यासाठी प्रत्येकी फक्त ३५ रुग्णांना मदत करण्याची मर्यादा हटवून ती अमर्याद करण्याची आग्रही मागणी खासदार नीलेश लंके यांनी लोकसभेत केली.