Ahmednagar Crime : जे तलवारीच्या साथीने जगतात ते तलवारीच्या पातीने मरतात!

पुरातन काळातही, वाईट मार्गाचा अखेर वाईट झाल्याचे दाखले मिळतात. त्यामध्ये आजही बदल झालेला नाही. कोणत्याही गुन्हेगाराला समाज कधीच मनापासून स्वीकारत नाही.
file photo
file photosakal

‘जगातील प्रेम आणि गुन्हेगारी’ कधीच संपणार नाही, असे म्हटले जाते. प्रेमाचा अंत प्रेमात होतो; परंतु गुन्हेगारीचा अंत नेहमी वाईटच होतो. ‘देव त्याला शिक्षा देईल’, ‘त्याचं देव वाटोळं करील’, ‘इथंच फेडावं लागेल,’ ‘तो नरकातच जाईल’, ही वाक्ये गल्लोगल्ली ऐकायला मिळतात. अगदी पुरातन काळातही, वाईट मार्गाचा अखेर वाईट झाल्याचे दाखले मिळतात.

त्यामध्ये आजही बदल झालेला नाही. कोणत्याही गुन्हेगाराला समाज कधीच मनापासून स्वीकारत नाही. सामान्य माणूस अशा प्रवृत्तीचा तिटकाराच करीत असतो, हे वास्तव आहे. ते कदापि नाकारता येणार नाही.

जगामध्ये पाप-पुण्य, सत्य-असत्य, खरे-खोटे, न्याय-अन्याय, हिंसा-अहिंसा अशा दोन गोष्टी असतात, पण महत्त्व पुण्य, सत्य, न्याय, अहिंसेलाच असते. कदाचित चुकीच्या किंवा गुन्हेगारांच्या दहशतीमुळे लोक काही बोलत नाहीत. काय करायचे आपल्याला, अशी त्यांची भावना असली, तरी ते मनातून कधीही गुन्हेगारीचे समर्थन करीत नाहीत, ही गोष्ट प्रथम लक्षात घेतली पाहिजे. लोकांना काही कळत नाही, असा समज करून घेण्यात काहीच अर्थ नाही.

गुंडापुंडांच्या टोळ्या, दरोडेखोर, लँडमाफिया नेहमीच सक्रिय असतात. त्यामध्ये नवीन काही नाही. त्या संपतील का? शहर किंवा जिल्हा गुन्हेगारमुक्त होईल? तर त्याचे उत्तर देता येणार नाही. मात्र, गुन्हेगारीकडे वळलेल्या मुलांचा शेवट काय होतो? ते सुंदर जीवन जगतात का, हा प्रश्न आहे.

file photo
Ahmednagar News : दलालांशिवाय होईनात कामे

मुंबईसारख्या शहरात एकेकाळी गँगस्टर सक्रिय होते. या टोळ्यांचे काय झाले? आज या टोळ्यांचे म्होरके कोठे आहेत? शेकडो गँगस्टर पोलिसांशी उडालेल्या चकमकीत मारले गेले. काही जणांनी हा मार्ग सोडून एक चांगले नागरिक म्हणून जीवन जगण्यास सुरवात केली. वेळीच सावध झाले म्हणून ठीक आहे, अन्यथा त्यांचाही कोणत्यातरी गोळीने बळी घेतला असता. जे लोक तलवारीच्या आधाराने जगतात, ते तलवारीच्या पातीनेच मरतात, हे नव्याने सांगण्याची गरज नाही.

मुळ मुद्दा असा आहे, की नगर शहर असो की जिल्हा; ज्यांच्या पाठीवर गुन्हेगारीचा डाग लागतो, तो कदापि पुसला जात नाही. गुन्हेगारी क्षेत्रात एक नव्हे, तर अनेक शत्रू असतात. कोठून गोळी येईल किंवा कोण हल्ला करेल, या भीतीच्या सावटाखाली गुन्हेगार जगत असतात. इतकेच कशाला, एखादा खून झाल्यानंतर त्या गुन्ह्यातील आरोपीला जेव्हा अटक होते.

file photo
Ahmednagar : भालगावला सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा; १२ जण अटकेत

तेव्हा त्याच्या आई-वडिलांचे, पत्नी, मुलाबाळांचे काय होते, याचा विचार करायला हवा. तुरुंगात वर्षानुवर्षे खितपत पडावे लागते. कधी जामीन होईल हे सांगता येत नाही. तसेच, ज्याची हत्या होते, त्या कुटुंबाबाबतही असा विचार येतो. म्हणजेच, दोन्ही बाजूंकडच्या कुटुंबांना कोणत्या दिव्यातून जावे लागते, याचा विचार कायदा हातात घेणाऱ्या मंडळींनी अंतर्मुख होऊन करायला हवा की नको?

एखाद्या गुन्ह्यात कुटुंबप्रमुखाला शिक्षा होते. मागे त्याच्या कुटुंबाचे काय होते? पत्नी, चिमुरडी मुले रस्त्यावर येतात. महिला गुन्हेगार असेल तर पती व मुलांचे हाल होतात. मुलांचे शिक्षण थांबते. आई किंवा बाप गुन्हेगार म्हणून मुले शाळेत हिणवतात. अशा वेळी मुलांवर मोठा परिणाम होतो. याचा बारकाईने विचार करायला हवा. आपल्याला मिळणारे धन हे कुमार्गाने येते की कष्टाने, याचे आत्मपरीक्षण करायला हवे.

file photo
Ahmednagar: संशयितपणे तोंडाला रुमाल बांधून येताना दिसला; वाळकी खूनप्रकरणातील फरार आरोपीला अखेर अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com