
देवदैठण : भारतीय बौद्ध महासभेचे पारनेर तालुकाध्यक्ष गिरीश गायकवाड (वय ३५, रा. नारायणगव्हाण, ता. पारनेर) यांचे (ता. ८) सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास अपघाती निधन झाले. नगर-पुणे महामार्गावर गव्हाणेवाडी (ता. श्रीगोंदे) येथे माजलगाव-पुणे एसटी बसने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली.