esakal | ब्रेकिंग ः पंच्यात झालीच... इंदोरीकरमहाराजांवर संगमनेर कोर्टात गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

Indorikar Maharaj filed a case in Sangamner court

सम आणि विषम तिथीबाबत इंदोरीकरांनी वक्तव्य केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पीसीपीएनडीटीचा कायद्याचा भंग केल्याच्या आरोपावरून त्यांच्याविरुद्ध कोर्टात फिर्याद दाखल करण्यात आली.

ब्रेकिंग ः पंच्यात झालीच... इंदोरीकरमहाराजांवर संगमनेर कोर्टात गुन्हा दाखल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर: विनोदी शैलीत समाजप्रबोधन करणारे नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदोरीकर महाराज यांच्यामागे लागलेले शुक्लकाष्ट संपायला तयार नाही. सम आणि विषम तिथीबाबत इंदोरीकरांनी वक्तव्य केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पीसीपीएनडीटीचा कायद्याचा भंग केल्याच्या आरोपावरून त्यांच्याविरुद्ध कोर्टात फिर्याद दाखल करण्यात आली. संगमनेरच्या कोर्टात हे प्रकरण सुनावणीसाठी येणार आहे. 

जिल्हा रुग्णालयाच्या पीसीपीएनडीटी सल्लागार समितीकडे इंदोरीकर महाराजांनी आपला खुलासा सादर केला होता. त्यात त्यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले होते. माझ्या बदनामीसाठी कोणीतरी व्हिडिओ यू ट्यूबवर अपलोड करते आहे, असा त्यांचाच आरोप होता. मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने  पोलिसांना डिजीटल पुरावे सादर केले होते. समितीच्या जिल्हाध्यक्ष अॅड. रंजना गावंदे यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना भेटून सविस्तर निवेदन दिले होते. आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालकांनी या प्रकरणात विशेष लक्ष घालण्याचे आरोग्य विभागाला सांगितले होते.

राजकीय नेते इंदोरीकरांमागे

इंदोरीकरमहाराजांच्या समर्थनार्थ मोठा भक्त परिवार तसेच सामाजिक संघटनाही पुढे आल्या होत्या. राष्ट्रवादी, भाजपसह सर्वच राजकीय पक्षांतील नेत्यांनी इंदोरीकरांमागे ताकद उभी केली होती. प्रसार माध्यमातून त्यांनी आपली भूमिकाही त्यांनी वेळोवेळी स्पष्ट केली होती. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनीही इंदोरीकरांना धारेवर धरले होते. त्यामुळे नगर जिल्ह्यात मोठा तणाव निर्माण झाला होता.

संगमनेर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात संगमनेर तालुका वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर भवर यांनी फिर्याद आणि पुराव्याची कागदपत्रे सादर केली. 

loading image
go to top