
कीर्तनकार निवृती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्याविरोधात जिल्हा सत्र न्यायालयात खटला सुरू आहे.
संगमनेर (अहमदनगर) : अपत्यजन्माबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी कीर्तनकार निवृती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्याविरोधात जिल्हा सत्र न्यायालयात खटला सुरू आहे. त्यात आज झालेल्या सुनावणीत कागदपत्रे सादर करण्याचा आदेश देण्यात आला. आता पुढील सुनावणी बुधवारी (ता. 16) होणार आहे.
इंदोरीकर महाराजांविरुद्ध खटल्याचे कामकाज मंगळवारऐवजी (ता. 8) आज झाले. या खटल्याबाबतची प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या कोर्टातील मूळ कागदपत्रे जिल्हा सत्र न्यायालयात सादर करावीत, असा अर्ज 2 डिसेंबर रोजी अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ऍड. अरविंद राठोड यांनी केला होता. त्यावर, या कागदपत्रांच्या प्रमाणित नकला जिल्हा सत्र न्यायालयात सादर करण्याचा आदेश न्यायालयाने ऍड. के. डी. धुमाळ यांना दिला. पुढील सुनावणी आता 16 डिसेंबर रोजी होणार असल्याचे ऍड. राठोड यांनी सांगितले.
संपादन : अशोक मुरुमकर