esakal | इंदोरीकर महाराजांसाठी मनसेने सारल्या बाह्या, पानसेंनी घेतली भेट
sakal

बोलून बातमी शोधा

Indurikar Maharaj was visited by MNS's Panse

पूत्रप्राप्तीबाबत सम-विषम तारखेचा संदर्भ देवून कीर्तनातून इंदोरीकर महाराजांनी केलेल्या एका विधानाचे पडसाद राज्यभर उमटले. त्यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीच्या नेत्यांसह अनेक संघटना तसेच राज्यभरातील वारकरी सांप्रदायाचे अनुयायी सरसावले आहेत.

इंदोरीकर महाराजांसाठी मनसेने सारल्या बाह्या, पानसेंनी घेतली भेट

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर ः जाहीर कीर्तनात दिलेल्या पुत्रप्राप्तीच्या सम-विषम तारखांच्या संदर्भामुळे प्रसिध्द कीर्तनकार इंदोरीकर महाराज कायद्याच्या फेऱ्यात अडकले आहेत. या चक्रव्युहातून त्यांना बाहेर काढण्यासाठी अनेक संघटना, वारकरी सांप्रदायाने रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही त्यांना पाठींबा जाहीर केला आहे. मनसेचे नेते अभिजीत पानसे यांनी आज त्यांच्या संगमनेर तालुक्यातील ओझर खुर्द येथील निवासस्थानी त्यांची भेट घेतली. 

हेही वाचा - कोरोना व्हायरस सुसाट

पूत्रप्राप्तीबाबत सम-विषम तारखेचा संदर्भ देवून कीर्तनातून इंदोरीकर महाराजांनी केलेल्या एका विधानाचे पडसाद राज्यभर उमटले. त्यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीच्या नेत्यांसह अनेक संघटना तसेच राज्यभरातील वारकरी सांप्रदायाचे अनुयायी सरसावले आहेत. मात्र तरीही त्यांच्यावर आरोग्य विभागाने पीसीपीएनडीटी (गर्भलिंग निदान कायदा)नुसार संगमनेर येथील न्यायालयात गुन्हा दाखल केला.

या बाबत त्यांना समन्स बजावण्यात आले असून, येत्या 7 ऑगस्ट रोजी त्यांना आपल्या वकीलासह न्यायालयात हजर राहून जामिन घ्यावा लागणार आहे. हा आरोप मान्य नसल्यास त्यांना वरीष्ठ न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचीही परवानगी आहे. या पार्श्वभूमीवर महाराजांच्या समर्थनार्थ वैभव पिचड यांनीही वारकरी आंदोलनात अग्रभागी राहण्याचा इशारा दिला होता. आता मनसेही रिंगणात उतरली अाहे. त्यांच्या नेत्यांनी भेटीगाठी सुरु केल्या आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अभिजीत पानसे यांनी आज सकाळी इंदोरीकर महाराज यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे, पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, वाहतूक नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष अनिकेत झोळेकर, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, सचिव डॉ. संजय नवथर, सरचिटणीस तुषार बोंबले आदी उपस्थित होते.

इंदोरीकरांकडून झालेल्या छोट्या चुकीबद्दल दिलगिरी महाराजांनी व्यक्त केली आहे. त्यांचे कीर्तनातून समाजप्रबोधनाचे मोठे कार्य करताना त्यांना अनाथ व निराधार मुलांसाठी स्वखर्चातून सुरु केलेली निवासी शाळांसारखी कामे दुर्लक्षित करता येणार नाहीत. 

- अभिजीत पानसे, मनसे नेते

 

संपादन - अशोक निंबाळकर
 

loading image