esakal | बापरे! पारनेर तालुक्यातील ४६ गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव
sakal

बोलून बातमी शोधा

Infiltration of corona in 46 villages of Parner taluka

पारनेर तालुक्यात सुमारे पाच महिन्यात 131 गावांपैकी 46 गावांमध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे.

बापरे! पारनेर तालुक्यातील ४६ गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव

sakal_logo
By
मार्तंड बुचुडे

पारनेर (अहमदनगर) : तालुक्यात सुमारे पाच महिन्यात 131 गावांपैकी 46 गावांमध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे. या 46 गावात 632 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आतापर्यंत आढळून आले आहेत. पैकी 461 रूग्णांनी कोरोनावर मात करत ते घरी पोहचले आहेत. मात्र दुर्देवाने 15 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 156 रूग्णांवर विविध रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

तालुक्यात सध्या एक महिन्यापासून आरोग्य विभागाने कोरोनाची रॅपीड टेस्टला सुरूवात केली. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. गेली काही दिवसांपासून सरासरी 20 ते 30 रूग्णांची नव्याने भर पडत आहे. मात्र याच काळात अनेकजण कोरोनावर मात करत सुखरूप घरी परतत आहेत. तरीही सध्या मृत्यू रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने तालुक्यात चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.

तालुक्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 72.32 टक्के आहे. तर कोरोना रूग्णांचा मृत्यू दर फक्त फक्त 2.34 आहे. तसा तो खूपच कमी असल्याने लोकांनी काळजी घ्यावी. केवळ घाबरून जाऊ नये, असे वैद्यकिय अधिकारी व प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे.

तसेच कोरोनाच्या रूग्णांमध्ये 66.61 टक्के पुरूष तर 33.39 टक्के महिला रूग्णांची संख्या आहे. तसेच तरूण 21 ते 40 वयोगटीतील रूग्णाची संख्या मात्र लक्षणीय आहे ती 261 आहे. त्या खालोखाल 41 ते 60 या वयोगटीतील रूग्णाची संख्या आहे. याचा अर्थ तरूण वर्ग कामानिमित्ताने बाहेर पडत असल्याने किंवा काळजी घेत नसल्याने ही संख्या अधिक दिसत आहे.

ऑगस्टपासून तालुक्यात रॅपीड टेस्ट सुरू झाल्याने रूग्ण संख्या वाढताना दिसत आहे. ती या पुर्वीही अससणार आहे. मात्र तपासणी न झाल्याने ती उघड झाली नाही, असे वैद्यकिय अधिकारी सांगत आहेत. कारण ज्या ठिकाणी कोरोनाबाधीत रूग्ण सापडतात. तेथे व त्यांच्या संपर्कातील व्यक्तींच्या रॅपीड टेस्ट केल्या जातात, असी माहीती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी दिली.

एकूण पॉझिटिव्ह : 156
बरे होऊन घरी गेले रूग्ण : 461
आतापर्यंत घेतलेले सॅम्पल : 4390
रॅपिड टेस्ट : 2303
स्वॉब टेस्ट : 2087
पॉझिटिव्ह रेट : 13.57  

संपादन : अशोक मुरुमकर